ETV Bharat / entertainment

Pathan Movie : 'पठाण’मध्ये दीपिका आजवरच्या सर्वाधिक आकर्षक अंदाजात दिसणार-सिद्धार्थ आनंद - Shahrukh Khan

अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika completed 15 years in bollywood industry) करियरची 15 वर्षे नुकतीच पूर्ण झाली. पठाण (Pathan Movie) मधून दीपिका आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र येत आहेत, ज्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे.

Pathan Movie
पठाण चित्रपट
author img

By

Published : Nov 10, 2022, 5:43 PM IST

मुंबई: दीपिका पदुकोनने (Deepika Padukone) ओम शांती ओम मधून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते आणि तिचा पहिला हिरो होता शाहरुख खान. त्या चित्रपटाला आणि दीपिकाच्या करियरची 15 वर्षे नुकतीच पूर्ण झाली. पठाण मधून दीपिका आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र येत आहेत, ज्याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. 'पठाण’मध्ये दीपिका पदुकोणच्या सुपरस्टारडमला न्याय मिळवून देणारी भूमिका लिहिली गेली आहे. तसेच त्यात दीपिकाच्या अभूतपूर्व हॉट आणि कूल अंदाजाची सरमिसळ झालेली दिसेल, असे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाला.

दीपिका सर्वाधिक आकर्षक अंदाजात दिसणार: सिद्धार्थ पुढे म्हणाला की, 'पठाण’मध्ये दीपिका तिच्या आजवरच्या सर्वाधिक आकर्षक अंदाजात दिसणार आहे. यापूर्वी प्रेक्षकांना कधीही न घडलेलं तिचं दिलखेच दर्शन घडणार आहे, जे त्यांच्या कायम स्मरणात राहील.

शाहरूख चार वर्षांनंतर चंदेरी पडद्यावर: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे यशराज फिल्म्सच्या पठाण’चे दिग्दर्शन करत असून, आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) नजरेतून भारतीय सिने-इतिहासातील सर्वात भव्य हेर विश्व उभे करत आहेत. शाहरूख खानसारखा सुपरस्टार तब्बल चार वर्षांनंतर चंदेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. त्याच्यासोबत अलौकिक लावण्य लाभलेली दीपिका आणि जॉन अब्राहम (John Abraham) झळकणार आहेत. यावेळी जॉन हा शाहरूखच्या (Shahrukh Khan) विरुद्ध भूमिकेत दिसेल.

शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण झळकणार: सिद्धार्थ आनंदने सांगितले की, हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात बड्या सुपरस्टार शाहरुख खान समवेत दीपिका पदुकोण झळकणार आहे. आणि तिची पठाणमधली भूमिका निव्वळ हृदयाचा ठोका चुकविणारी नसून त्याहून बरेच काही आम्ही शब्दबद्ध केले आहे, हे आम्हाला माहित आहे. तिच्या सुपरस्टारडमलाही न्याय मिळवून दिला आहे हे कोणीही मान्य करेल. ती पठाणमध्ये पहिल्यांदाच हॉट आणि कूल अंदाजात दिसणार आहे.

दिग्गज ऑन-स्क्रीन जोडी: एसआरके आणि दीपिका ही भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील दिग्गज ऑन-स्क्रीन जोडी आहे, ज्यांनी ओम शांती ओमसारखा महान ब्लॉकबस्टर दिला. एसआरके आणि डीपी यांची स्पेनमधील छायाचित्र अलीकडे ‘लीक’ झाली. या ग्लॅमरस जोडीने मेल्लोर्कात वेगळीच उंची असलेले गाणे चित्रित केले. त्यात एसआरके त्याच्या एट-पॅकमध्ये दिसला तर डीपी म्हणजेच दीपिका तिच्या परफेक्ट बिकिनी अंदाजात दिसली. त्यानंतर ही दोघे स्पेनच्या कॅडीझ आणि जेरेझ येथील चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी रवाना झाले. पठाण २५ जानेवारी २०२३ रोजी हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.