मुंबई : ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूडच्या सर्व स्टार्सनी आपापल्या शैलीत हा खास दिवस साजरा केला. अनेक स्टार्सने सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यासोबतच चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. यासोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रा, मुले आणि तिच्या आईसह घरी तिरंगा फडकावला. शिल्पा शेट्टीने आपल्या कुटुंबासोबत तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओ देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. दरम्यान, युजरचे लक्ष शिल्पाच्या शूजकडे गेले आणि तिला याबाबत सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. शिल्पा शेट्टीने झेंडा फडकवताना शूज घातले होते. त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर टीका केली. दरम्यान आता शिल्पा शेट्टीने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शिल्पा शेट्टीची पोस्ट झाली व्हायरल : शिल्पा शेट्टीच्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'शूज काढून झेंडा फडकावला असता तर बरे झाले असते. त्यानंतर दुसऱ्या एकाने या पोस्टवर कमेंट करत म्हटले, शिल्पाच्या पतीचे मास्क कुठे गेले. आणखी एका युजरने म्हटले, चप्पल घालून कोण झेंडा फडकविते, अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहे. त्यानंतर शिल्पाने नेटकऱ्यांना या प्रकरणी गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे. शिल्पा शेट्टीने कमेंट करत या पोस्टवर लिहिले की, 'ध्वज फडकवितांनाचे मला सर्व नियम माहित आहेत, माझ्या देशाचा आणि ध्वजाचा आदर माझ्या मनातून येतो. हा प्रश्न मांडण्यासाठी येत नाही. आजची पोस्ट शेअर करून हा दिवस साजरी करण्यासाठीची होती. सर्व ट्रोलर्सवर मी सहसा दुर्लक्ष करते, पण मी या दिवशी दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या तथ्यांना बरोबर करा. शिल्पाची ही कमेंट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
वर्क फ्रंटवर : शिल्पा शेट्टीच्या वर्क फ्रंटवर, बोलायचे झाले तर ती लवकरच रोहित शेट्टीच्या ओटीटी शो 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याशिवाय धृव सर्जा यांच्या आगामी 'केडी: द डेव्हिल' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. निर्माते लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहे.
हेही वाचा :