ETV Bharat / entertainment

Ileana D'Cruz Son : इलियाना डिक्रूजनं भावूक होऊन शेअर केले बाळाचे फोटो; म्हणाली... - ileana Dcruz worried about her baby

Ileana D'Cruz Son : इलियाना डिक्रूजनं तिच्या मुलासोबतचे सोशल मीडियावर काही फोटो शेअर केला आहेत. या फोटोमध्ये ती तनावात दिसत आहे.

इलियाना डिक्रूजचा मुलगा
Ileana D'Cruz Son
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 12:26 PM IST

मुंबई - Ileana D'Cruz Son : अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. इलियाना ही यापूर्वी तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत होती. तिला बाळ होऊन आता 2 महिने झाले आहे. दरम्यान आता तिनं इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या बाळासोबत आहे. इलियानानं आपल्या मुलाचे नाव कोआ फीनिक्स डोलन असं ठेवलं आहे. शेअर केलेल्या फोटोवरुन ती तणावात असल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये तिचे मुल हे निट दिसत नाही. इलियाना ही सध्या घरी असून तिच्या मुलाची काळजी घेत आहे. कोआचा जन्म हा 1ऑगस्ट 2023 रोजी झाला. इलियाना आपला पूर्ण वेळ मुलाला देत आहे.

इलियानानं सोशल मीडियावर पोस्ट केलं फोटो : इलियाना डिक्रूजनं शेअर केलेल्या फोटोमध्ये इलियानाचा अर्धा चेहरा दिसत आहे. तसेच तिचं मुल हे शांतपणे तिच्या खांद्यावर झोपलं आहे. या फोटोवर तिनं कॅप्शनमध्ये लिहलं 'तुमच्या बाळाला वेदना होत असताना तुम्ही काहीही तयार करत नाही.' या फोटोवरुन ही पुष्टी होते की, तिच्या बाळाला खूप वेदना होत आहेत. त्यानंतर तिनं दुसऱ्या फोटोमध्ये लिहलं , '2 महिने आधीचं.' तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत तिच्या बाळाचं कौतुक करत आहेत. याशिवाय तिला काळजी घेण्यासाठी सल्ला देत आहेत.

इलियाना डिक्रूजनं सर्वांनाचं केलं आश्चर्यचकित : इलियाना डिक्रूजनं तिच्या अचानक गरोदरपणानं सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी, तिनं तिच्या मुलाला कोआ फिनिक्स डोलनचं जन्मनाव दिलं. तिच्या बाळाच्या नावाचा अर्थ योद्धा आणि निर्भय आहे. दरम्यान त्यानंतर चाहत्यांना वाटलं की इलियानाचा सोलमेट कोण आहे. याबद्दल देखील सर्वेजण उत्सुक होते. इलियानानं 13 मे रोजी बॉयफ्रेंड मायकेल डोलनसोबत लग्न केलं.

इलियाना डिक्रूझ वर्कफ्रंट : इलियाना शेवटी रॅपर बादशाहच्या 'सब गजब' गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. ती अभिषेक बच्चनसोबत 'द बिग बुल'मध्येही होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केलं आहे. ती लवकरच रणदीप हुड्डासोबत 'अनफेअर अँड लव्हली'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. OMG 2 and Gadar 2 : 'ओमएजी 2' आणि 'गदर 2' लवकरच होणार ओटीटीवर प्रदर्शित ; जाणून घ्या डेट...
  2. 12th Fail Trailer Out: विक्रांत मॅसीचा स्टारर '12 फेल'चा ट्रेलर झाला प्रदर्शित
  3. Keemti song out: 'मिशन राणीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू'मधील अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राचा रोमँटिक ट्रॅक झाला रिलीज...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.