ETV Bharat / entertainment

I Love You trailer out: रकुल प्रीत सिंगचा रोमँटिक थ्रिलर ओटीटी रिलीजसाठी सज्ज

author img

By

Published : Jun 8, 2023, 3:46 PM IST

रकुल प्रीत सिंग आणि पावेल गुलाटी यांचा आगामी चित्रपट आय लव्ह यूचा ट्रेलर ८ जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट जिओ सिनेमावर ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

I Love You trailer out
रकुल प्रीत सिंगचा रोमँटिक थ्रिलर

मुंबई - आय लव्ह यू या आगामी रोमँटिक थ्रिलर चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग अभिनेता पावेल गुलाटीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. रघुलने शेअर केले की, या चित्रपटात प्रेम, बदला आणि विश्वासघात यांचे मिश्रण पाहायला मिळणार आहे. ओटीटीवर थेट प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटात प्रेमाची उत्कट आणि डार्क बाजू दाखवण्यात आली आहे आणि या चित्रपटात अक्षय ओबेरॉय आणि किरण कुमार यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटाबद्दल बोलताना रकुल प्रीत सिंग म्हणाली की, 'आय लव्ह यू हा चित्रपट मी यापूर्वी केलेल्या कोणत्याही कलाकृतीपेक्षा वेगळा आहे कारण कथाकथनात प्रेम, सूड आणि विश्वासघात या भावनांचा एकत्रितपणे समावेश केला गेला. शिवाय यात विलक्षण नाट्य, सस्पेन्स आणि थ्रिलर या प्रकारांचा खुबीने वापर करण्यात आलाय. एक जबरदस्त कथानक आणि सर्व कलाकारांची उत्तम कामगिरी यात पाहायला मिळेल. या चित्रपटावरील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी उत्सुक झाली आहे'.

आय लव्ह यू या चित्रपटाचे कथा ही सत्य प्रभाकरची आहे. ही भूमिका रकुल प्रीत सिंगने साकारली आहे. मुंबईतील एक स्वतंत्र काम करणारी स्त्री असलेल्या तिच्या आयुष्यात ती आणि तिच्या आयुष्यातील प्रेम त्यांच्या नात्याला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाते. त्याचप्रमाणे तिच्या जीवनात एक मोठा बदल होतो. पावेल गुलाटी यांनी देखील याबाबत बोलताना सांगितले की, 'जेव्हा निखिलने मला चित्रपटाची कथा सांगितली, तेव्हा मी लगेचच होकार दिला. कथेने मला विरोधाभासी पात्रांच्या छटा उलगडून दाखविल्या, जे पूर्णपणे उत्कंठावर्धक होते. आय लव्ह यू त्याच्या सादरीकरणामध्ये पूर्णपणे भिन्न, वेगवान, भावनांमध्ये चैतन्यपूर्ण आणि त्याच वेळी त्याच्या कथनात खूप आनंददायक आहे. प्रेक्षक आमचा चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.'

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, आय लव्ह यू चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माते निखिल महाजन यांनी केले आहे आणि ज्योती देशपांडे, सुनीर खेतरपाल आणि गौरव बोस यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 16 जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा

१. Shraddha Kapoor Pic : श्रध्दा कपूरने दिला चाहत्यांना तंदुरुस्त राहण्याचा संदेश

२. Ms Dhoni : महेंद्र सिंग धोनी प्रॉडक्शनच्या लेट्स गेट मॅरीड चित्रपटाचा टीझर रिलीज

३. Om Raut Criticized : आदिपुरुष दिग्दर्शक ओम राऊतने तिरुपती मंदिरात क्रिती सेनॉनचे चुंबन घेतल्याने वाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.