ETV Bharat / entertainment

Elvish Yadav Song : उर्वशी रौतेलासोबत 'हम तो दिवाने' म्यूझिक अल्बममध्ये झळकणार एल्विश यादव.... - एल्विश यादव

Elvish Yadav Song: 'बिग बॉस ओटीटी 2' जिंकणारा यूट्यूबर एल्विश यादव सध्या चर्चेत आला आहे. एल्विशची झलक एका म्यूझिक व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. या गाण्यामध्ये त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला दिसणार आहे.

Elvish Yadav Song
एल्विश यादवचे गाणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 6:32 PM IST

मुंबई Elvish Yadav Song : 'बिग बॉस 'ओटीटी 2'चा विजेता बनल्यानंतर एल्विश यादव सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. एल्विश हा यापूर्वी शहनाज गिलसोबत दिसला होता. एल्विशची शहनाजनं मुलाखत घेतली होती. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एल्विशची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच एल्विशला अनेक प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे. लवकरच तो त्याच्या चाहत्यांसाठी 'हम तो दिवाने' हा नवीन म्यूझिक अल्बम घेऊन येणार आहे. या गाण्यात त्याच्यासोबत बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला दिसणार आहे. उर्वशी एल्विशसोबत काम करण्यासाठी तो खूप उत्सुक होता.

'हम तो दिवाने' गाणे होणार लवकरच प्रदर्शित : शनिवारी एल्विशनं त्याच्या लेटेस्ट गाण्याचं 'हम तो दिवाने'चं फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं. ज्यामध्ये तो बी टाऊन ब्युटी उर्वशी रौतेलासोबत दिसत आहे. या पोस्टरशिवाय एल्विश यादवनं गाण्याची रिलीज डेटही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एल्विशनं या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'फिर से कर देना सिस्टम हैंग,' हम तो दिवाने' गाणे 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रदर्शित होईल.' असं त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहलं आहे. काही दिवसांपूर्वी एल्विश आणि उर्वशी राजस्थानमध्ये एका गाण्याचं शूटिंग करत होते. शूटिंगदरम्यानचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये दोघेही देसी लूकमध्ये दिसले. या गाण्याचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. एल्विशचे चाहतेही या गाण्याची वाट खूप आतुरतेनं पाहत आहेत.

उर्वशीनं केलं एल्विश यादवचं कौतुक : उर्वशीनं एल्विशबद्दल कौतुक करताना म्हटलं, 'एल्विश यादवनं खरोखरच 'हम तो दिवाने' मध्ये उत्कृष्ट काम केलं आहे. त्यानं सर्वांना आश्चर्यचकित केलं. माझ्या मते बॉलिवूडला एल्विशसारख्या हिरोची गरज आहे. संपूर्ण शूट दरम्यान, माझं लक्ष फक्त त्याच्यावर होतं, कारण माझा विश्वास आहे की जेव्हा नायक सर्वोत्तम कामगिरी करतो तेव्हा ऑनस्क्रीन कपल हे सर्वोत्तम दिसते.' उर्वशी रौतेलाने 'हम तो दीवाने' गाण्याच्या पोस्टरमध्ये लाल रंगाचा अनारकली सूट घातला आहे. याशिवाय एल्विश यादवनं लाला रंगाचा चेक्सचा शर्ट, काळी पँट आणि लेदर जॅकेट घातलं आहे. हे गाणं यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. एल्विशचे चाहते या दोघांवर खूप खूश आहेत आणि त्यांचं अभिनंदन करत आहेत.

हेही वाचा :

  1. Brahmastra part 2 dev : अयान मुखर्जी लवकरच घेऊन येणार 'ब्रह्मास्त्र पार्ट 2 - देव'; सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर...
  2. Akshay Kumar Birthday : अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या विशेष चित्रपटांबद्दल...
  3. Shahrukh Khan And Anand Mahindra : नैसर्गिक संसाधन घोषित केल्याबद्दल शाहरुख खानने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे मानले आभार...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.