मुंबई - चित्रपट जगतातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची आजी पद्मा राणी ओमप्रकाश यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राकेश यांनी कुटुंबासाठी हा अत्यंत दुःखाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. हृतिक रोशनचे त्याच्या आजी-आजोबांवर खूप प्रेम होते आणि ते त्याच्या सर्वात जवळचे होते. 2019 मध्ये हृतिकने त्याचे आजोबा जे ओम प्रकाश गमावले होते. जे ओम प्रकाश हे चित्रपट निर्माता-दिग्दर्शक होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनची आजी पद्मा राणी यांचा मृत्यू वृद्धत्वाशी संबंधित आरोग्य समस्यामुळे झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्या रोशन कुटुंबासोबत राहत होत्या आणि संपूर्ण कुटुंब त्यांची काळजी घेत होते. हृतिकची आई पिंकी रोशन घरात सर्वात जास्त आईची काळजी घेत असे. पिंकी रोशननेही आपल्या आईसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जे ओम प्रकाश यांनी राजेश खन्ना यांच्या 'आप की कसम' या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी 'अपना बना लो', 'अपनापन', 'आशा' आणि 'आदमी खिलौना है' सारखे चित्रपट केले. जे ओम प्रकाश यांनी 'आई मिलन की बेला', 'आस का पंची', 'आये दिन बहार के', 'आँखों आँखों में' आणि 'आया सावन झूम के' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. जे ओम प्रकाश यांचे 2019 मध्ये वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
राकेश रोशन हे देखील यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो 'फायटर' आणि 'विक्रम वेधा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा - प्रियंकाची आई मधु चोप्राचा वाढदिवस, आजीच्या मांडीवर दिसली प्रियंकाची लेक