ETV Bharat / entertainment

Fighter Last Shoot : हृतिक रोशन स्टारर 'फायटर' चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार पूर्ण... - हृतिक रोशन

Fighter Last Shoot : अभिनेता हृतिक रोशनचा आगामी चित्रपट 'फायटर'चं शूटिंग लवकरच पूर्ण होणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेने पाहत आहे.

Fighter Last Shoot
फायटरचं लास्ट शुटिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 5:48 PM IST

मुंबई - Fighter Last Shoot : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आगामी चित्रपट 'फायटर'साठी चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये तो अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. त्याचा हा एरियल अ‍ॅक्शन चित्रपट आहे. 'पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हा चित्रपट बनवत आहेत. 'फायटर' चित्रपटाचे शूटिंग आज 30 ऑक्टोबर रोजी संपणार आहे, मात्र काही शेवटचे सीन हे शुट करण्यात येणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबर 2022 मध्ये आसाममधील एअर फोर्स स्टेशनवर सुरू झाले होते. या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी हृतिक रोशन हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबत राहत होता. हृतिकनं या चित्रपटासाठी खूप मेहनत केली आहे. दरम्यान या चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल शूट होणार आहे. चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलमध्ये हृतिक रोशनचे काही भयानक स्टंट शूट होणार आहेत. शूटिंगचा हा 87 वा दिवस आहे. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये हे शूट पूर्ण होणार आहे.

'फायटर' चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार पूर्ण : 'फायटर'चे शूटिंग सिद्धार्थ आनंदनं हे देशातील वेगवेगळ्या ठिकाणी केले आहे. यानंतर, चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनवर काम केले जाईल. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'फायटर' चित्रपटाचे आणखी काम बाकी आहे. हे काम यशराज स्टुडिओमध्ये सुरू आहे. काही दिवसानंतर चित्रपटामधील भयानक स्टंट शूट होईल. या चित्रपटात जबरदस्त व्हिएफएक्स असणार आहे. त्यामुळे प्रत्येक शॉर्ट्सवर खूप बारीकीनं काम केले जाणार आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. रुपेरी पडद्यावर यशराज बॅनरचा हा चित्रपट लवकरच धमाका करेल.

ही असेल 'फायटर'ची स्टारकास्ट : दीपिका पदुकोण 'फायटर'मध्ये आयएएफ अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशनही एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. 'फायटर'मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. Raj kundra UT 69 : दिल्लीच्या चांदणी चौकात राज कुंद्रानं केलं अनोख्या 'छंदा'चं प्रदर्शन
  2. Mami Film festival 2023 : मामी फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रियांका चोप्रानं भूमी पेडणेकरवर उधळली स्तुती सुमनं
  3. Singham 3 : 'सिंघम 3'मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूक रिलीज; सोशल मीडियावर चाहत्यांनी केलं कौतुक...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.