पणजी (गोवा) : हृतिक रोशन-सबा आझाद आणि सुझैन खान-अर्सलान गोनी हे कथित जोडपे काही दिवसांपूर्वी गोव्यात एकत्र दिसले होते. सोशल मिडीयावर त्यांची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. ज्यात हृतिक आणि सुझान अनुक्रमे साबा आणि अर्सलान यांच्या नवीन जोडीदारासोबत दिसत आहेत.अभिनेत्री पूजा बेदीने गेट-टूगेदरमधील छायाचित्रे शेअर केली असून, यात दिग्दर्शक अभिषेक कपूरसह सुझानची भावंडे फराह खान अली आणि झायेद खान देखील उपस्थित होते. हृतिक काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये तर साबा गुलाबी रंगाच्या सुंदर पोशाखात चमकदार दिसत होती.
2000 मध्ये केले लग्न
हृतिक आणि सुझान यांनी 2000 मध्ये लग्न केले. त्यांनी 2013 मध्ये वेगळे झाले. तसेच एका वर्षानंतर घटस्फोट घेतला. कोरोनात मुलांसोबत एकत्र वेळ घालवण्यासाठी 2021 मध्ये सुझॅन हृतिकसोबत राहायला गेली. हृतिक अभिनेता आणि गायक साबाला डेट करत आहे. ते मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये हातात हात घालून दिसले होते. सुझॅनच्या अली गोनीच्या चुलत भाऊ अर्सलानसोबत नातेसंबंधात आहे.
हेही वाचा - Tejaswi Prakash buys audi Q7 : तेजस्वी प्रकाशने खरेदी केली नवीन ऑडी