ETV Bharat / entertainment

Hrithik Roshan : 'हू इज युअर गायनेक' या वेब सीरिजसाठी हृतिक रोशननं केलं गर्लफ्रेंड सबा आझादचं कौतुक...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2023, 9:55 PM IST

Hrithik Roshan : हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद 'हू इज युअर गायनेक' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. हृतिकनं या वेब सीरिजबाबत इंस्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं वेब सीरिजमधील काम केलेल्या कलाकारांचे अभिनंदन केले आहेत. यासह त्यानं सबाचं देखील कौतुक केले आहे.

Hrithik Roshan
हृतिक रोशन

मुंबई - Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद 'हू इज युअर गायनेक' या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान आता हृतिकनं गर्लफ्रेंड सबा आझादचं कौतुक केले आहे. हृतिकनं इंस्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहलं, 'हा किती आश्चर्यकारक आणि हार्ट वार्मिंग शो आहे. मी नॉन-स्टॉप सर्व एपिसोड पाहिले, उत्तम काम मित्रांनो, मला आशा आहे की आणखी काही राहिल असेल संपूर्ण टीमचे अभिनंदन'.त्यानंतर त्यानं पुढे म्हटलं, प्रत्येक अभिनेता कौतुकास पात्र आहे याशिवाय हसविण्यासाठी आणि अश्रूंसाठी धन्यवाद. सबा आझाद तू खूप अप्रतिम आहेस. तुम्हाला याचा खूप अभिमान वाटला पाहिजे'. त्यासोबत त्यानं रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे. हृतिकच्या पोस्टला प्रतिसाद देताना, सबानं लाल हार्ट इमोजीसह धन्यवाद म्हटलं आहे.

हृतिक रोशन गर्लफ्रेंड सबा आझादचं केलं कौतुक : या वेब सीरिजमध्ये सबा आझाद डॉ. विदुषी कोठारीची भूमिका साकारत आहे. ही वेब सीरिज ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनॅकॉलॉजिस्टची आहे. या वेब सीरिजमध्ये विदुषी ही वैयक्तिक आणि जीवनात समतोल राखतांना दिसत आहे. सबाचा हा शो अ‍ॅमॅझोन मिनी टिव्ही ( Amazon Mini TV) वर प्रसारित झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हृतिक रोशन आणि सबा आझाद डिनर डेटवर एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरू लागल्या होत्या. तसेच सबा ही हृतिकच्या कुटुंबासोबतच्या अनेक कार्यक्रमामध्येही दिसली होती. गेल्या मे महिन्यात हृतिक हा करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सबासोबत हातात हात घालून फिरत होता, त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या पुष्टी मिळाली होती.

हृतिक रोशन झाला घटस्फोट : हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा कुटुंबासोबत क्वालिटी टाइमही घालवतात. हृतिकचे पहिले लग्न इंटिरियर डिझायनर सुजैन खानसोबत झाले होते. नोव्हेंबर 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. हृतिक आणि सुजैनला रेहान आणि हृदान ही दोन मुले आहेत. हृतिक आणि सबा एक वर्षाहून अधिक काळ डेट करत आहेत. दरम्यान, हृतिकच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्यासोबत दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या 'फाइटर' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय त्याच्याकडे कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर सोबत दिग्दर्शक अयान मुखर्जीचा अ‍ॅक्शन थ्रिलर 'वॉर 2' देखीलआहे.

हेही वाचा :

  1. Actor Vivek Oberoi Fraud Case : अभिनेता विवेक ओबेरॉयला दीड कोटींचा गंडा; आरोपीला अटक
  2. Latest 3 flims BO collection : 'फुक्रे 3', 'द व्हॅक्सिन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' हे चित्रपट रिलीजच्या पाचव्या दिवशी किती कमाई करणार ?
  3. Tejas teaser out: कंगना राणौत स्टारर 'तेजस' चित्रपटचा टीझर झाला प्रदर्शित; पहा टीझर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.