ETV Bharat / entertainment

विक्रम वेधातील हृतिक रोशनच्या अल्कोहोलिया गाण्यामुळे इंटरनेटवर वादळ - Hrithik Roshan dance on Alcoholia song

विक्रम वेधा चित्रपटाच्या निर्मात्यांनी अल्कोहोलिया हे गाणे रिलीज केले. या गाण्यातील व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि रोहित सराफ एका बारमध्ये नाचताना दिसत आहेत. गाण्यात मद्यधुंद अवस्थेत दिसणारा हृतिक आपल्या जबरदस्त नृत्य कौशल्याने सर्वांना मोहित करुन सोडत आहे.

अल्कोहोलिया गाण्यामुळे इंटरनेटवर वादळ
अल्कोहोलिया गाण्यामुळे इंटरनेटवर वादळ
author img

By

Published : Sep 19, 2022, 1:38 PM IST

मुंबई - हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या विक्रम वेधा चित्रपटाच्या निर्मात्यांनी अल्कोहोलिया हे गाणे रिलीज केले. दोन मिनिटांपेक्षा जास्त लांबीच्या व्हिडिओमध्ये हृतिक रोशन आणि रोहित सराफ एका बारमध्ये नाचताना दिसत आहेत. हृतिक रोशन जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. विशाल आणि शेखर यांनी गायलेले अल्कोहोलिया हे मनोज मुनतशिर यांनी लिहिले आहे.

"द डान्सिंग नंबर ऑफ द इयर" म्हणून सादर करण्यात आलेल्या गाण्यात स्निग्धाजित भौमिक आणि अनन्या चक्रवर्ती हे गायक आहेत. गाण्यात मद्यधुंद अवस्थेत दिसणारा हृतिक आपल्या जबरदस्त नृत्य कौशल्याने सर्वांना मोहित करुन सोडत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

शनिवारी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात अल्कोहोलिया लाँच करण्यात आले, ज्यात हृतिक रोशन, राधिका आपटे, रोहित सराफ आणि चित्रपट निर्माता जोडी गायत्री आणि पुष्कर उपस्थित होते. गायत्री आणि पुष्कर या चित्रपट निर्मात्या जोडीने दिग्दर्शित केलेला विक्रम वेधा ३० सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, सैफ अली खान, राधिका आपटे आणि रोहित सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

विक्रम वेधा हा त्याच नाव आणि दिग्दर्शक असलेल्या 2017 तमिळ चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात हृतिकने वेधा या गँगस्टरची भूमिका साकारली आहे, तर सैफ अली खान विक्रम या पोलिसाची भूमिका साकारत आहे.

वर्क फ्रंटवर, हृतिक रोशन शेवटचा 2019 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट वॉरमध्ये दिसला होता, ज्यामध्ये टायगर श्रॉफ देखील होता. विक्रम वेधा व्यतिरिक्त, अभिनेता दीपिका पदुकोण सोबत फायटरमध्ये दिसणार आहे.

दरम्यान, सैफ अली खान प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात क्रिती सेनन देखील मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा - डॉक्टर जी रिलीज तारीख ठरली, आयुष्मान म्हणतो, "अपॉयमेंटसाठी तयार रहा"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.