ETV Bharat / entertainment

War 2 goes on floor : हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या 'वॉर 2' च्या शुटिंगला सुरुवात - स्पाय थ्रिलर वॉर 2

War 2 goes on floor : हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांच्या भूमिका असलेल्या वॉर चित्रपटाचं शुटिंग सुरू झालंय. या चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोत अयान मुखर्जी त्याच्या टीमसोबत परदेशी लोकेशनवर शुटिंसाठी जाताना दिसला आहे.

War 2 goes on floor
'वॉर 2' च्या शुटिंगला सुरुवात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 4:13 PM IST

मुंबई - War 2 goes on floor : हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर हे दोन दिग्गज स्टार 'वॉर 2' चित्रपटात एकत्र काम करणार असल्याची घोषणा झाल्यापासून 'वॉर 2' हा ट्रेंड वादळ निर्माण करतआहे. या चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाबद्दलची हवा निर्माण झालीय. अगदी अलिकडची घडामोड म्हणजे चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झालेत. त्यामुळे चित्रपटाबद्दलच्या चर्चेला ऊत आला आहे. या फोटोमध्ये 'वॉर 2' चा दिग्दर्शक अयान मुखर्जी त्याच्या टीमसोबत सेटच्या दिशेने जाताना दिसत आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर अभिनीत स्पाय थ्रिलर 'वॉर 2' साठी निर्माता आदित्य चोप्रानं अभिनेत्री कियारा अडवाणीची निवड केली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील आगामी चित्रपटात एड्रेनालाईन-पंपिंग अ‍ॅक्शन असणार आहे. शिवाय या चित्रपटात हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात जबरदस्त युद्ध पाहायला मिळेल.

यशराज फिल्म (YRF) स्पाय युनिव्हर्स आणि 'वॉर 2'मध्ये कियारा अडवाणीला घेण्याचा विचार निश्चित केल्याचं समजतंय. 'यशराज फिल्म स्पाय युनिव्हर्समध्ये आजवर 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर' आणि 'पठाण' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी प्रेक्षकांना गुंतवून ठेवलंय. 'टायगर'च्या सिक्वेलना चांगलं यश मिळालंय. आता 'वॉर' आणि त्यानंतर 'पठाण'चाही सिक्वेल या स्पाय सुनिव्हर्स अंतर्गत बनवला जाणारेय. बॉलिवूडमध्ये अनेक यशस्वी अभिनेत्री असल्या तरी सध्या कियारा ही टॉपवर आहे त्यामुळे आदित्य चोप्राने तिला 'वॉर 2' साठी साईन केल्याची बातमी आहे. 'वॉर 2' या चित्रपटात हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी सारखे तीन सुपरस्टार आहेत! या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस्वी तरुण आणि अयान मुखर्जी करत आहे. आदित्य चोप्रा आता सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन चित्रपट बनवण्यासाठी सज्ज झालाय.

अभिनेत्री कियारा अडवाणीला अयान आणि आदित्य 'वॉर 2' चित्रपटात कसे सादर करतात हे पाहणं रोमांचक असणार आहे. दरम्यान, कियाराचा रोमॅटिक कॉमेडी चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यात ती कार्तिक आर्यनसोबत झळकली होती.

हेही वाचा -

1. Ganpath : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन स्टारर 'गणपथ'चा प्रोमो झाला प्रदर्शित; रिलीजच्या पहिल्या दिवशी किती करेल कमाई...

2. Prabhas Wedding : अभिनेता प्रभासला यंदा कर्तव्य आहे... जवळच्या व्यक्तीने दिली बातमी

3. Koffee With Karan 8 : कॉफी विथ करण 8 व्या पर्वासाठी करण जोहर सज्ज, शेअर केली सेटची झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.