मुंबई - गेली कित्येक वर्षे हॉलिवूड चित्रपटांमध्ये ॲक्शनला प्राधान्य दिलेले दिसून येते. आपल्याकडेही ॲक्शन चित्रपट जोर पकडू लागले आहेत. शाहरुख खान अभिनित आणि निर्मित पठाण हा संपूर्णतः ॲक्शन ने भरलेला चित्रपट होता आणि तो सुपरहिट ठरल्यामुळे अनेकांना ॲक्शन चित्रपटांची भुरळ पडू लागली आहे. अर्थात याआधीही बॉलीवूडमध्ये काही अभिनेते, हाताच्या बोटावर मोजता येतील इतके, ॲक्शन हिरो म्हणून ओळखले जातात, ज्यात सर्वात वर नाव आहे जॉन अब्राहम याचे. हा हँडसम हंक त्याच्या ॲक्शन साठी प्रसिद्ध आहे आणि बरीचशी साहसदृष्ये तो स्वतःच करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
![सोनू सूदसह हॉलिवूड स्टंट्समन ली व्हिटेकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-john-anraham-jollywood-action-ditector-fateh-mhc10001_10052023114431_1005f_1683699271_654.jpg)
हॉलिवूडचे स्टंट्समन करणार बॉलिवूडमध्ये ॲक्शन - जॉन अब्राहमचा एक नवीन ॲक्शन चित्रपट येतोय ज्याचे सध्या चित्रीकरण जोरात सुरू आहे. अर्थात यात जबरदस्त ॲक्शन हवी असे त्याचे आणि निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यांना वाटते की या चित्रपटातील ॲक्शन दृश्ये आंतरराष्ट्रीय पातळीची असायला हवीत. त्यामुळे ॲक्शन स्टार जॉन अब्राहमने फतेह साठी हॉलिवूड मधील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टरला भारतात निमंत्रित केले आहे. अफलातून ॲक्शन साठी (Lee Whittaker) ली व्हीटेकर हे नाव हॉलिवूड मधील प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी जुरासिक पार्क, फास्ट अँड फ्युरियस आणि बाहुबली सारख्या दर्जेदार चित्रपटाची सहासदृष्ये दिग्दर्शित केली आहेत. त्यामुळे फतेह मधील ॲक्शन जबरदस्त होणार याबद्दल निर्माते खात्री बाळगून आहेत.
स्टंट्समन ली व्हिटेकर करणार टीमचे नेतृत्व - सोनू सूदने ली व्हिटेकर यांना आपल्या आगामी चित्रपट फतेह साठी खास बोलावून आणले आहे त्यामुळे तो चित्रपट पूर्णतः अॅक्शन-पॅक्ड सिनेमा असेल असे त्याचे मत आहे. यात यापूर्वी कधीही न पाहिलेले ॲक्शन सिक्वेंसेस प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत असे जॉन म्हणतो. जगभरात सर्वोत्तम ॲक्शन डिझाईन करण्याचा अनुभव असलेल्या ली व्हिटेकर यांना एका विशेष टीमचे नेतृत्व करण्यासाठी लॉस एंजेलिसमधून बोलावण्यात आले.
![सोनू सूदसह हॉलिवूड स्टंट्समन ली व्हिटेकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-john-anraham-jollywood-action-ditector-fateh-mhc10001_10052023114431_1005f_1683699271_292.jpg)
जबरदस्त अॅक्शन दृश्य्यांची सेनू सूदला खात्री - स्वतःला आव्हान पेलण्यास मजा येते असे सांगत सोनू सूद पुढे म्हणाला की, 'नवीन चित्रपटांमध्ये मला नेहमीच आधीच्या कामापेक्षा वेगळे करायला आवडते. ली व्हिटेकर आणि उर्वरित टीमने अप्रतिम काम केले असून कोणीही आपल्या कामात कोणतीही कसर सोडलेली नाही. मी प्रेक्षकांना यापूर्वी त्यांनी कधीही न पाहिलेले काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो त्यांना भावेल अशी अपेक्षा आहे. आम्ही काही अविश्वसनीय अॅक्शन दृश्ये चित्रित केली असून ती बघताना प्रेक्षक तोंडात बोटे घालतील इतकी थरारक आहेत, जी आम्ही त्यांना पडद्यावर दाखवण्यासाठी उत्सुक आहोत.' फतेहमध्ये जॉन अब्राहम सोबत जॅकलिन फर्नांडिस असून हा चित्रपट या वर्षाअखेरीस प्रदर्शित होणार आहे.