मुंबई - ऐतिहासिक विषयावरील मराठी चित्रपट 'सुभेदार'ने पहिल्या दिवशी दमदार पाऊल बॉक्स ऑफिसवर टाकल्यानंतर पहिल्या आठवड्याचा शेवटही गोड केला आहे. पहिल्या वीकेंडला रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ५. ०६ कोटीची कमाई केली. 'सुभेदार' चित्रपट शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. त्यादिवशी चित्रपटाने १ कोटी १६ लाख इतकी कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली, या दिवशी १ कोटी ६९ लाख रुपयांची कमाई झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. रविवारी 'सुभेदार' चित्रपटाने २ कोटी २२ लाख इतका गल्ला गोळा केला.
-
‘SUBHEDAR’ WINS HEARTS, CONQUERS BOXOFFICE… Director #DigpalLanjekar’s #Marathi film #Subhedar scores EXCELLENT numbers in its opening weekend… Fri 1.15 cr, Sat 1.69 cr, Sun 2.22 cr. Total: ₹ 5.06 cr.
— taran adarsh (@taran_adarsh) August 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Presented by AA Films and Everest Entertainment. pic.twitter.com/IeOdcSKqO0
">‘SUBHEDAR’ WINS HEARTS, CONQUERS BOXOFFICE… Director #DigpalLanjekar’s #Marathi film #Subhedar scores EXCELLENT numbers in its opening weekend… Fri 1.15 cr, Sat 1.69 cr, Sun 2.22 cr. Total: ₹ 5.06 cr.
— taran adarsh (@taran_adarsh) August 28, 2023
Presented by AA Films and Everest Entertainment. pic.twitter.com/IeOdcSKqO0‘SUBHEDAR’ WINS HEARTS, CONQUERS BOXOFFICE… Director #DigpalLanjekar’s #Marathi film #Subhedar scores EXCELLENT numbers in its opening weekend… Fri 1.15 cr, Sat 1.69 cr, Sun 2.22 cr. Total: ₹ 5.06 cr.
— taran adarsh (@taran_adarsh) August 28, 2023
Presented by AA Films and Everest Entertainment. pic.twitter.com/IeOdcSKqO0
गेल्या काही वर्षात शिवकालीन ऐतिहासिक चित्रपटांची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक विषय हाताळले जात आहेत. अलिकडेच रिलीज झालेला 'रावरंभा' असो की हंबीरराव मोहितेंच्या जीवनावरील चरित्रपट असो, प्रेक्षक या विषयावरील आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. दिग्पाल लांजेकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विस्तृत चरित्र आठ भागात सादर करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे आणि ताकदीने ते पेललेही आहे. 'सुभेदार’ हा चित्रपट लांजेकरांच्या शिवराज अष्टकातील, 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज नंतरचा पाचवा चित्रपट आहे. पूर्वीच्या चित्रपटाला जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद प्रेक्षकांनी पहिल्या आठवड्यात दिल्याचे दिसून येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य रक्षणाची जबाबदारी उचलणाऱ्या मावळ्यांची यशोगाथा शिवराज अष्टकमधून दाखवली जात आहे. 'सुभेदार' या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. खरंतर काही वर्षापूर्वी ओम राऊतने 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा याच विषयावरील चित्रपट हिंदीत बनवला होता. बिग बजेट आणि अजय देवगण, सैफ अली खान सारखी तगडी स्टार कास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्याच विषयावरील चित्रपट बनवणे व्यवसायिकदृष्ठ्या जोखमीचे होते. परंतु ऐतिहासिक चित्रपट बनवण्यासाठी आत्मसात केलेले आवश्यक कौशल्य, पटकथा आणि मराठी कलाकारांवरील विश्वास आणि स्वराज्य रक्षणासाठी जीवाचे बाजी लावलेल्या मावळ्यांची कथा सांगताना दिग्पाल लांजेकर बिल्कुल डगमगलेला नाही याची प्रचिती 'सुभेदार' चित्रपटावरुन येते.
हेही वाचा -
१. Gadar 2 vs OMG 2 box office day 18: 'गदर 2'च्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर घसरतेय 'ओ माय गॉड 2'ची कमाई....