ETV Bharat / entertainment

Hina Khan and Rocky Jaiswal : हिना खानच्या व्हिडिओने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ - हिडिओ व्हायरल

अभिनेत्री हिना खानने पार्किंगमध्ये तिच्या प्रियकराला किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हिना खान आणि रॉकी जैस्वाल
Hina Khan and Rocky Jaiswal
author img

By

Published : May 25, 2023, 12:16 PM IST

मुंबई : छोट्या पडद्यावर फार लोकप्रिय झालेली अभिनेत्री हिना खान सध्या चर्चेत आली आहे. हिना खानचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, हिना खान तिचा दीर्घकाळाचा प्रियकर रॉकी जैस्वालला पार्किंगमध्ये किस करताना दिसत आहे. आता या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून या व्हिडिओची चौफेर चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये ती फोटोग्राफरशी बोलतांना म्हटले, 'इथे फार गरमी आहे. श्रीनगरमध्ये फार थंड आहे. तुम्ही पण तिकडे चला', त्यानंतर हिनाला तिचा बॉयफ्रेड हा विमानतळावर घ्यायला आला तेव्हा बोलतांना तिने पार्किंगमध्ये त्याला लिप किस केला. हा व्हिडिओ व्हायरल होतांच या व्हिडिओवर फार भरभरून कमेंट येत आहे. काहीजणांनी तिला चांगला म्हटले आहे. तर काहींनी तिला या गोष्टीमुळे ट्रोल देखील केले आहे.

कमेंटचा पाऊस : एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहले, 'तुमच्या शिवाय 'ऐ रिस्ता क्या कहलाता है' हा शो चांगला वाटत नाही, तर दुसऱ्याने म्हटले, 'कॅमेरा समोर असा देखावा करणे जरूरी आहे का, तर आणखी एकाने म्हटले की, 'चालता चालता किस करणे काही गरजेच आहे का ? सोबत तर आहात तुम्ही थोड्या वेळात रूममध्ये जाणार आहे ना..' तर कोणी तिला तिच्या वयावरून देखील टोमणे मारले आहे. हिना खान ही तिच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि ती प्रत्येकाला ही जवळीची वाटते कारण तिचा 'ऐ रिस्ता क्या कहलाता है' हा शो फार हिट होता.

'बीग बॉस' शो : ती अनेकदा आपले फोटो इंन्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिच्या पोस्टला अनेकजण लाईक करतात. काही वेळा हिना ही इंन्टाग्राम लाईव्ह करून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. हिना अनेकदा सेलेब्रिटीच्या पार्टयांमध्ये दिसत असते. तिने 'बीग बॉस' शोमध्ये देखील सहभाग घेतला होता. त्यावेळी हिना शो जिंकण्यात थोड्याने चूकली या शोचा ग्रँड फिनाले 14 जानेवारी 2018 रोजी झाला आणि शिल्पा शिंदेला विजेती तर हिना खान उपविजेती म्हणून घोषित करण्यात आली होते. या शोचा होस्ट हा सलमान खान होता.

हेही वाचा : Gemadpanthi web series : थरारक रशरशीत कॉमेडी गेमाडपंथीमध्ये पूजा कातुर्डे दिसणार बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजात!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.