ETV Bharat / entertainment

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरुन राजकारण तापले

' द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आदेश देण्यास केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. केरळमधील ३२ हजार मुली धर्मांतरीत केल्याचे याच्या कथानकात म्हटले आहे. याला आव्हान देत चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाचे आपला निर्णय दिला. दरम्यान या चित्रपटावरुन राजकीय वादाला सुरुवात झाली असून याचे प्रतिसाद कर्नाटकातील निवडणूक प्रचारातही उमटत आहेत.

The Kerala Story
द केरळ स्टोरी चित्रपट
author img

By

Published : May 6, 2023, 10:02 AM IST

Updated : May 6, 2023, 10:26 AM IST

कोची (केरळ): ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्याला फार चर्चेत आहे. 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आदेश देण्यास केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. सोशल मीडियावर या चित्रपटामुळे चर्चेला आता एक वादाला नवा विषय मिळाला असून अनेक नेटकरी या वादाला एक वेगलीच वळणं दिल्याचं सोशल मीडियावर दिसत आहे. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करतात या सत्यघटनेवर हा चित्रपट आधारित आहे.

काय आहे चित्रपटात? : या चित्रपटातील ट्रेलर हा समाजाच्या विरोधात आहे का, हे न्यायालयाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात आक्षेपार्ह काय होते? अल्लाह एकच देव आहे असे म्हणण्यात गैर काय आहे? देशाने नागरिकांना त्यांचा धर्म आणि देव मानून त्याचा प्रसार करण्याचा अधिकार दिला आहे. ट्रेलरमध्ये काय आक्षेपार्ह होते? चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर विचार न्यायालयाने निरीक्षण केले. यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक चित्रपट आले आहेत. याआधीही अनेक चित्रपटांमध्ये हिंदू भिक्षू आणि ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात संदर्भ आले आहेत. हे सर्व तुम्ही काल्पनिक पद्धतीने पाहिले आहे का? आता यात विशेष काय आहे? हा चित्रपट सांप्रदायिकता कसा निर्माण करतो? आणि समाजात संघर्ष या द्वारे होईल हे न्यायालयाने निरीक्षण केले.

याचिकाकर्त्यांनी काय युक्तिवाद केला : या चित्रपटामुळे निष्पाप लोकांच्या मनात विष घुसवले जाईल, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की केरळमध्ये 'लव्ह जिहाद'चे अस्तित्व अद्याप कोणत्याही एजन्सीला सापडलेले नाही. न्यायमूर्ती एन नागेश आणि न्यायमूर्ती मोहम्मद नियास सीपी यांनी खंडपीठाने यावर विचार केला आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित, या चित्रपटाने आगामी चित्रपटावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रियांसह एक मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. 'द केरळ स्टोरी'मध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आला कारण त्यात दावा केला होता की राज्यातील 32,000 मुलींचे धर्मांतर करण्यात आल्याचा दावा या चित्रपटाद्वारा करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

कर्नाटक विधानसभा प्रचारातही केरळ स्टोरीची चर्चा - दरम्यान द केरळ स्टोरीवरुन सुरू झालेली चर्चा आता राजकीय वळणावर पोहोचली आहे. सध्या कर्नाटकात विधानसभेच्या निवडणूका सुरू आहेत. यातही द केरळ स्टोरीवरुन चर्चा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छेडली आहे. काँग्रेसवर हल्लोबल करताना पंतप्रधान मोदी जाहीर सभेत म्हणाले की, देशातील इतक्या सुंदर आणि प्रतिभावान लोक असलेल्या राज्यात घडलेली दहशतवादी कारस्थानाची गोष्ट द केरळ स्टोरी चित्रपटात मांडली आहे. देशात दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या पाठीशी तिथे काँग्रेस उभी राहिली हे वाईट आहे. कर्नाटकातील लोकांना अशा या काँग्रेस बाबतीत सावध राहावे, असे मोदी म्हणाले.

तर केरळ सरकारने पुन्हा तपास करावा - केरळचे राज्यापाल आरिफ मोहम्मद खान यांनीही द केरळ स्टोरी चित्रपटाबाबत बोलताना आपण हा चित्रपट पाहिला नसल्याचे सांगितले. ही सत्यकथा आहे असे जर चित्रपट निर्मात्यांचे मत असेल तर या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे, असे राज्यपाल म्हणाले.

हेही वाचा : Deepika Padukone: 'मेट गाला' में डेब्यू करने के लिए आलिया को दीपिका पादुकोण ने थम्स अप दिया, बोलीं 'तुमने कर दिखाया'

Last Updated : May 6, 2023, 10:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.