ETV Bharat / entertainment

Ranbir is prepping to portray Ram : 'रामायण'मध्ये प्रभू रामाच्या प्रामाणिक भूमिकेसाठी रणबीर कपूर करणार 'या' गोष्टींचा त्याग - Ranbir is prepping to portrayRam

Ranbir is prepping to portray Ram : रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. तो आगामी 'रामायणा'वर आधारित चित्रपटातही प्रभू रामाची भूमिका साकारणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाच्या तयारीसाठी रणबीरनं सर्वप्रकारची तयारी सुरू केलीय.

Ranbir is prepping to portrayRam
प्रभू रामाच्या प्रामाणिक भूमिकेसाठी रणबीर कपूरची तयारी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 4:43 PM IST

मुंबई - Ranbir is prepping to portray Ram : नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी 'रामायण' चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभू भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. या बातमीला निर्मात्यांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी, अलिकडचे रिपोर्ट असं सूचित करतात की, रणबीर कपूर चित्रपटातील प्रभू रामाच्या पात्राशी संबंधित शुद्धतेचे अनुकरण करण्यासाठी दारू आणि मांसाहाराचं सेवन टाळण्यास तयार आहे.

अशी चर्चा आहे की चित्रपटाशी संबंधित कलाकारांना आत्मसंयमाची जीवनशैली अंगीकारण्यासाठी मार्गदर्शन केलं जातंय. साऊथ अभिनेत्री साई पल्लवी या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार आहे. तर केजीएफ फेम अभिनेता यश यामध्ये रावणाची भूमिका साकारणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर ही भूमिका साकरण्यासाठी दारु आणि मांसाहाराचं सेवन थांबवणार आहे. ही यासाठीची अट नाही किंवा तो आरोग्याच्या समस्येमुळंही असा निर्णय घेणार नाही तर प्रभू रामचंद्राची भूमिका शुद्धपणे साकारण्यासाठी ते हा निर्णय घेणार आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये या आगामी रामायण चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग प्रामुख्याने प्रभू राम आणि सीतेच्या कथेवर केंद्रित असेल, ज्यात रावणाने केलेल्या सीतेचे अपहरणाचेही कथानक असेल. चित्रपटाच्या VFX कामासाठी प्रॉडक्शन हाऊसनं ऑस्कर विजेत्या कंपनी DNEG सोबतही संधान साधलं आहे.

दरम्यान निर्माता भूषण कुमार कबीर सिंग आणि अर्जुन रेड्डी दिग्दर्शित केलेल्या संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, आगामी अ‍ॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशन गुंतला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये अनिल कपूरनं रणबीरच्या ऑन-स्क्रीन वडीलांची भूमिका साकारली आहे. रश्मिकानंयात रणबीरच्या प्रेयसीची भूमिका केलीय, तर बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. निर्मात्यांनी सनी देओलच्या 'गदर 2' आणि अक्षय कुमारच्या 'OMG 2' सोबत बॉक्स ऑफिसवरील टक्कर टाळण्यासाठी 'ॲनिमल' रिलीजची तारीख ऑगस्ट ते डिसेंबर अशी पुढे ढकलली होती. यात निर्माते यशस्वी झाले असले तरी या चित्रपटाची विकी कौशलच्या 'सॅम बहादूर' चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर देईल.

हेही वाचा -

1. Animal First Song Hua Main: हेलिकॉप्टरमध्ये रोमान्स करताना हरवले रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना

2. Hbd Ss Rajamouli: उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा वाढदिवस ; जाणून घ्या त्यांच्या 'या' गोष्टी...

3. Tiger 3: ट्रेलर रिलीजच्या आधी सलमान खाननं शेअर केलं अ‍ॅक्शनमोडमधील कतरिना कैफचं सोलो पोस्टर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.