मुंबई - Chiranjeevi congratulated the Salar team : प्रभासची मुख्य भूमिका असलेला ''सालार : भाग 1 सीझफायर'' हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट ओपनिंग केली आणि 100 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हसन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मोठ्या अपेक्षेसह 'अॅनिमल', 'जवान' आणि 'पठाण' सारख्या चित्रपटांच्या सुरुवातीच्या कमाईला मागे टाकत पहिल्याच दिवशी 'सालार'च्या कमाईचा जगभरातील बॉक्स ऑफिसवरील आकडा 178 कोटी इतका विक्रमी आहे. याबद्दल ज्येष्ठ अभिनेता चिरंजीवी यांनी प्रभास आणि 'सालार' टीमचे अभिनंदन केले.
-
Heartiest Congratulations my dear ‘Deva’ #RebelStar #Prabhas 🤗#SalaarCeaseFire has put the Box Office on Fire 🔥🔥
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) December 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Kudos to Director #PrashanthNeel on this remarkable achievement. You truly excel at world building.
My love to the Superb ‘Varadaraja Mannar’ @PrithviOfficial…
">Heartiest Congratulations my dear ‘Deva’ #RebelStar #Prabhas 🤗#SalaarCeaseFire has put the Box Office on Fire 🔥🔥
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) December 23, 2023
Kudos to Director #PrashanthNeel on this remarkable achievement. You truly excel at world building.
My love to the Superb ‘Varadaraja Mannar’ @PrithviOfficial…Heartiest Congratulations my dear ‘Deva’ #RebelStar #Prabhas 🤗#SalaarCeaseFire has put the Box Office on Fire 🔥🔥
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) December 23, 2023
Kudos to Director #PrashanthNeel on this remarkable achievement. You truly excel at world building.
My love to the Superb ‘Varadaraja Mannar’ @PrithviOfficial…
चिरंजीवीने, X वर शनिवारी आपला 'सालार'च्या यशाबद्दचा आपला उत्साह व्यक्त केला. बॉक्स ऑफिसवरील तुफान कमाईबद्दल प्रभास आणि टीमचे कौतुक केले. त्यांनी दिग्दर्शक प्रशांत नीलच्या जागतिक निर्मिती कौशल्याची प्रशंसा केली आणि क्रूच्या उत्कृष्ट कामाची प्रशंसा करण्याबरोबरच पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन आणि जगपती बाबू यांच्यासह इतर कलाकारांचे अभिनंदन केले.
"माझ्या प्रिय 'देवा' आणि रिबेल स्टार प्रभासचे मनापासून अभिनंदन. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिग्दर्शक प्रशांत नील यांचे अभिनंदन. तुम्ही खरोखरच जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. माझे पृथ्वीराज सुकुमारनलाही भरपूर प्रेम. त्यानं साकारलेला वरदराज मन्नार सुपर्ब होता.", असं लिहित चिरंजीवी यांनी संपूर्ण 'सालार' टीमचे अभिनंदन केले आहे.
'सालार'मध्ये प्रभासने देवा, पृथ्वीराज सुकुमारनने वरदराज मन्नारची भूमिका साकारली आहे, जगपती बाबूने राजमन्नारची भूमिका साकारली आहे, आणि श्रुती हासनने आद्याची भूमिका केली आहे. होंबळे फिल्म्स अंतर्गत विजय किरगंडूर यांनी 'केजीएफ'च्या संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या रवी बसरूरसह साउंडट्रॅक हाताळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपट दोन भागांमध्ये उलगडतो. सालार: भाग 1 - सीझफायर आणि शौर्यंगा अशी चित्रपटाची दोन पर्व असतील. 22 डिसेंबर रोजी विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या 'डंकी'शी स्पर्धा करत आहे. बेकायदेशीर हिंसक खानसार जगात सेट केलेला, सालार हा चित्रपट दोन बालपणीच्या मित्रांची, देवा आणि वरदची कहाणी आहे.
2023 मध्ये प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटाला अपयशाचा सामना करावा लागला होता. चित्रपटाबद्दलची हाईप खूप वाढली होती. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 80 कोटीहून अधिक कमाई केलेला हा चित्रपट दुसऱ्या दिवसापासून गडगडला. यातील संवाद, ग्राफिक्स, रावणाचे पात्र आणि इतर अनेक गोष्टी वादग्रस्त ठरल्या. या चित्रपटाचा खर्च सुमारे 400 कोटी होता. हा आकडाही चित्रपट गाठू शकला नव्हता. त्याआधी त्याचा 'राधे श्याम' हा चित्रपटही फसला होता. त्यामुळे प्रभासचे चाहते 'सालार'ची आतुरतेनं वाट पाहात होते. अखेर त्यांचा प्रार्थनेला फळ मिळाले असून 'सालार' विक्रमी कमाई करत आहे.