मुंबई - Dunki Drop 3: शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित 'डंकी' चित्रपटाचं नवं गाणं रिलीज करण्यात आलंय. "निकले थे कभी हम घर से" असे शीर्षक असलेलं हे गाणं मायदेशी परतण्याची तीव्र इच्छा असलेल्या कष्टकऱ्यांच्या वेदना सांगणारं आहे. सोनू निगमनं अतिशय भावूक होऊन हे गाणं गायलंय. जावेद अख्तर यांच्या लेखनीतून उतरलेल्या या गाण्याला संगीतकार प्रीतम यांनी चाल लावली आहे. 'डंकी ड्रॉप 3' मध्ये हे गाणं चित्रपटाचं आकर्षण ठरत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
शाहरुख खाननं आपल्या सोशल मीडियावर हे गाणं शेअर केलंय. शाहरुखनं हे गाणं शेअर करताना हिंदीमध्ये लिहिलंय, ''माझ्या मनात आलेलं हे गाणे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. नावावरून राजू आणि सोनू हे आपल्यापैकीच एक आहेत असे वाटतात. आणि या दोघांनी संगीतबद्ध केलेले हे गाणेही त्यांचेच आहे. हे आपल्या कुटुंबातील सदस्यांबद्दलचं आहे... ते आपल्या मातीबद्दल आहे... आपल्या देशाच्या बाहूंमध्ये शांतता शोधण्याबद्दलचं आहे.
कधी कधी आपण सर्वजण गावापासून... शहरापासून... आयुष्य घडवण्यासाठी आपापल्या घरापासून दूर जातो.... पण आपली ह्रदये आपल्या घरामध्ये...देशामध्येच राहतात. माझ्या आवडत्या डंकी चित्रपटातून", असे त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
'डंकी' चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, बोमन इराणी आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रस्तुत डंकी हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
'डंकी' चित्रपटाचं प्रमोशन अतिशय दमदारपणे सुरु आहे. 'डंकी'चे आतापर्यंत तीन झलक दाखवण्यात आल्या आहेत. यापूर्वी एक गाणंही रिलीज करण्यात आलं होतं. एकदम हटके डान्स स्टेप्स असलेलं ते गाणं गणेश आचार्यनं कोरिओग्राफ केलं होतं. आता रिलीज करण्यात आलेलं "निकले थे कभी हम घर से" गाणं अतिशय हृदयस्पर्शी आहे. याच्या व्हिडिओमध्ये शाहरुख आपल्या सहकाऱ्यांह दूर देशाला कामाच्या निमित्तानं प्रवास करताना दिसतोय. गाण्याच्या व्हिडिओमध्ये फोटोंचा वापर करण्यात आलाय.
हेही वाचा -
1. विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक, मेघना गुलजारच्या दिग्दर्शनावर टीका
2. देशभरात सर्वत्र 'अॅनिमल' मॅनिया, चाहत्यांनी ठरवलं ब्लॉकबस्टर
3. अंकिता लोखंडेनं मुनावर फारुकीपासून स्वतःला केलं दूर, तर खानजादीला सोडायचा आहे शो