ETV Bharat / entertainment

Happy Birthday Tabu: बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी दिल्या तब्बूला वाढदिवसाच्या शुभेच्छा - करीना कपूर

Happy Birthday Tabu: बॉलिवूड अभिनेत्री तब्बू तिचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देल्या आहेत.

Happy Birthday Tabu
तब्बूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 2:13 PM IST

मुंबई - Happy Birthday Tabu : अभिनेत्री तब्बू तिचा 4 नोव्हेंबर रोजी 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी चित्रपटसृष्टीतील अनेकजण तिला शुभेच्छा देत आहेत. अजय देवगण, करीना कपूर, फराह खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली आहे. तब्बू तिच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळं जास्त चर्चेत असते. वयाच्या 52 व्या वर्षीही तब्बू अविवाहित आहे. तब्बूचं पूर्ण नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे. तब्बूनं हिंदी चित्रपट आणि वेब सीरीज तसेच साऊथ चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयानं सर्वाचे मनं जिंकले आहेत. जवळपास 38 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या तब्बूनं अनेक उत्तम चित्रपट दिलेत.

Happy Birthday Tabu
तब्बूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सेलिब्रिटींनी दिल्या तब्बूला शुभेच्छा : अजय देवगणनं तब्बूचा एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना त्यानं कॅप्शन लिहलं की, 'कधी चाकांच्या मागे तर कधी पडद्यामागे, तुझ्यासोबत सर्वकाही साहसी आहे'. तब्बूला शुभेच्छा देताना करीना कपूरनं लिहलं, 'हॅपी बर्थडे डिअर तब्बू, तुझा दिवस खूप खास जावो'. त्यानंतर फराह खाननं लिहलं, 'हॅपी बर्थडे डार्लिंग' याशिवाय तिचे अनेक चाहते तिला या खास दिवशी शुभेच्छा देत आहेत. तब्बू वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच काहीही उघड करत नाही. तिचे नाव अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले. पण दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबतच्या तिच्या नात्याची खूप चर्चा होती.

Happy Birthday Tabu
तब्बूला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तब्बूचं करिअर : तब्बूनं 'हम नौजवान हैं' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, तिला खरी लोकप्रियता 1994 मध्ये आलेल्या 'विजयपथ' चित्रपटातून मिळाली. तब्बूनं तिच्या कारकिर्दीत 'माचीस', 'बॉर्डर', 'चांदनी बार', 'विरासत', 'चीनी कम', 'दृश्यम', 'हैदर', 'गोलमाल अगेन' आणि 'भूल भुलैया 2' यासारखे उत्कृष्ट हिंदी चित्रपट दिले आहेत. तिला उत्कृष्ट अभिनयासाठी दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलंय. याशिवाय तिनं पद्मश्रीसारखा सन्मानही पटकावला आहे. तब्बूनं हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली आणि मराठी भाषांमध्येही चित्रपट केलंय.

वर्क फ्रंट : तब्बूच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तब्बूची अखेर विशाल भारद्वाजच्या 'खुफिया'मध्ये दिसली होती. आता ती 'द क्रू' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केलंय. 'द क्रू' चित्रपटात करीना कपूर खान, क्रिती सेनॉन आणि दिलजीत दोसांझ यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. Ali Mercchant Got married : अभिनेता अली मर्चंटनं मॉडेल अंदलीब जैदीशी केलं लग्न; फोटो व्हायरल
  2. Sara ali khan and Ananya panday: सारा अली खान आणि अनन्या पांडे 'कॉफी विथ करण'च्या 8व्या सीझनमध्ये झळकणार
  3. Hrithik Roshan in Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3'मध्ये झळकणार हृतिक रोशन?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.