मुंबई : जेष्ठ अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग या 8 जुलै रोजी 65 वर्षांच्या झाल्या आहेत. सध्याला नीतू सिंग या कुटुंबासोबत लंडनमध्ये असून त्या वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी नीतू सिंगचे कुटुंबीय आणि त्यांचे चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. रणबीर कपूरने लंडनला पोहोचून आपल्या आईला आश्चर्यचकित केले आणि तिचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला. दुसरीकडे, काही कारणास्तव आलिया भट्ट ही सासू नीतू सिंगचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला जाऊ शकली नाही. आलिया भट्टने तिला भारतातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि लेक राहाच्या वतीने आजीला खूप प्रेम पाठवले आहे. आलिया भट्टने सासू नीतू सिंगचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आलियाने लिहिले आहे की, 'राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तूझे सर्व काही अद्भुत आणि तुझ्यावर खूप प्रेम आहे', असे आलियाने पोस्टमध्ये लिहले आहे.
सासू नीतू सिंगसाठी आलिया भट्टची अभिनंदनाची पोस्ट : दरम्यान नीतू सिंगने त्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टमध्ये लंडनमधील एक कौटुंबिक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'सुंदर दिवस, आलिया भट्ट आणि राहा मला तुमच्या प्रेमाची खूप आठवण झाली, माझ्या सर्व मुलांसाठी प्रेम'. अशी पोस्ट नीतू सिंग यांनी केली.
आलिया भट्ट सासूच्या वाढदिवसाला का येऊ शकली नाही? : 6 जुलै रोजी संध्याकाळी रणबीर कपूर हा त्याच्या आईला तिच्या 65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकटाच लंडनला रवाना झाला होता. तर, 6 जुलैच्या रात्री आलिया भट्ट एका महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. रणबीर कपूर लंडनला पोहोचण्यापूर्वी आलियाने तिच्या इव्हेंटचे फोटोही शेअर केले होते. त्यामुळे आलिया ही लंडनला जाऊ शकली नाही.
नीतू कपूरचे वर्क फ्रंट : नीतू कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर त्यांचा शेवटचा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला 'बेशरम' होता. यामध्ये त्या रणबीरसोबत मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. पण आता त्या धर्मा प्रोडक्शनच्या 'जुग जुग जियो' या चित्रपटातून कम-बॅक करत आहे. त्यांचा हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :