ETV Bharat / entertainment

Devi's half-birthday : बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरने मुलगी देवीचा साजरा केला अर्धा वाढदिवस - देवीचा साजरा केला अर्धा वाढदिवस

अभिनेत्री बिपाशा बसूने शुक्रवारी तिची मुलगी देवी सहा महिन्यांची झाल्याच्या निमित्ताने तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये बिपाशाचा पती करण सिंग ग्रोव्हर पिवळ्या प्रिंटसह पांढऱ्या रंगाच्या कपड्यातील देवीला कडेवर घेतलेला दिसत आहे.

Devi's half-birthday
देवीचा साजरा केला अर्धा वाढदिवस
author img

By

Published : May 13, 2023, 12:26 PM IST

मुंबई - बॉलिवूड कपल बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर त्यांची लाडकी मुलगी देवीची झलक त्यांच्या चाहत्यांना देतात. शुक्रवारी, बिपाशाने तिच्या इन्स्टाग्रमवर मुलगी १२ मे रोजी सहा महिन्याची झाल्याच्या निमित्ताने एक सुंदर फोटो शेअर केला.

बिपाशा करणची मुलगी देवी ६ महिन्यांची झाली - इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले, आमच्या हृदयाला 6 महिन्यांच्या निमित्ताने शुभेच्छा. देवी हिला ज्यांनी प्रेम, शुभेच्छा आणि गोड भेटवस्तू पाठवल्या त्या प्रत्येकाचे आभार.' छान फोटोत बिपाशाचा पती करण सिंग ग्रोव्हरने पिवळ्या प्रिंटसह पांढऱ्या रंगाच्या बाळाच्या कपड्यातील मुलगी देवीला कडेवर घेतले आहे. फोटोत एक फुगा आणि '1/2 वे टू वन' असे छापलेले टी-शर्ट व अनेक गिफ्ट बॉक्स आणि मऊ खेळण्यांनी वेढलेले दिसू शकतात.

बिपाशा बसू आई झाल्यानंतरची पोस्ट - बिपाशा बसूला तिच्या सोशल मीडियावर तिच्या मुलीचे फोटो आणि गोंडस व्हिडिओ शेअर करणे आवडते. अलीकडेच तिने एक क्लिप शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिच्या लहान मुलीचा उल्लेख अ‍ॅथलीट म्हणून केला आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर यांना त्यांच्या लग्नाच्या सहा वर्षांनंतर गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी कन्या रत्न प्राप्त झाले होते. बिपाशाने आई झाल्यानंतर एक पोस्ट लिहून मुलीचे नाव देवी असल्याची घोषणा केली होती. फोटोसह बिपाशाने लिहिले होते , '12.11.2022. देवी बसू सिंग ग्रोव्हर. आपल्या प्रेमाचे आणि माँच्या आशीर्वादाचे भौतिक प्रकटीकरण येथे आहे आणि ती देवी आहे.' गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी या सुंदर जोडप्याने अधिकृतपणे घोषित केली की ते त्यांच्या पहिल्या मुलाची वाट पाहात आहेत.

वर्कफ्रंटवर करण सिंग ग्रोव्हर आगामी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या पुढील एरियल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट फायटरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता निर्मात्यांनी कास्ट आणि क्रूची घोषणा केली तेव्हापासून सुरू झाली आहे.

हेही वाचा - Parineeti And Raghav Engagement : परिणीती आणि राघव यांचा दिल्लात साखरपुडा ; प्रियांका चोप्रा कार्यक्रमासाठी दिल्लीत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.