ETV Bharat / entertainment

'हनुमान'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत 'गुंटूर कारम'ला टाकले मागे - हनुमानची कमाई

Hanuman Vs Guntur Kaaram : साऊथ अभिनेता तेजा सज्जा स्टारर 'हनुमान' आणि महेश बाबू अभिनीत 'गुंटूर कारम' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहेत. दरम्यान, पाचव्या दिवशी या दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली हे जाणून घेऊ या.

Hanuman Vs Guntur Kaaram
हनुमान vs गुंटूर कारम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 2:40 PM IST

मुंबई - Hanuman Vs Guntur Kaaram : साऊथ अभिनेता तेजा सज्जा अभिनीत 'हनुमान' बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. 'हनुमान' चित्रपटानं 4 दिवसांत जगभरात 100 कोटींचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. साऊथ अभिनेता महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'ला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या टक्कर देत आहे. 'हनुमान' चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर 'गुंटूर कारम', 'कॅप्टन मिलर', 'मेरी ख्रिसमस', 'आयलान'आणि 'मिशन चॅप्टर 1' सुरू आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. 'हनुमान' चित्रपटाच्या निर्मात्यांनी राम मंदिर ट्रस्टला 14 कोटी रुपये दान केले आहेत.

  • #HanuMan stands tall, finds APPRECIATION and ACCEPTANCE, both… Continues to set cash registers ringing on Day 5… Several Tier-2 and Tier-3 centres are FANTASTIC… Fri 2.15 cr, Sat 4.05 cr, Sun 6.17 cr, Mon 3.80 cr, Tue 2.60 cr. Total: ₹ 18.77 cr. #India biz. Note: #Hindipic.twitter.com/qIZikAilTB

    — taran adarsh (@taran_adarsh) January 17, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Sensational on working days💥
    Can easily cross 150Cr from hindi version and 400Cr+ World wide from all versions💥 pic.twitter.com/jyVER1MT4B

    — White knight 🦇 (@santhoshtiger14) January 17, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'हनुमान' आणि 'गुंटूर कारम'ची कमाई : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'हनुमान'ची एकूण कमाई 'गुंटूर कारम'पेक्षा कमी असली तरी, पाचव्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटानं त्याला मागे टाकले आहे. 'गुंटूर कारम'नं पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.95 कोटी आणि 'हनुमान'नं 13.11 कोटींची कमाई केली आहे. आता हनुमान वर्ल्डवाइड 150 कोटींकडे वाटचाल करत आहे. 'गुंटूर कारम'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 41.3 कोटीची कमाई केली. दुसरीकडे 'हनुमान' चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 8.05 कोटीचा व्यवसाय केला होता. 'गुंटूर कारम'चे एकूण पाच दिवसांचे देशांतर्गत कलेक्शन 93.95 कोटींवर पोहोचले आहे. याशिवाय 'हनुमान'चं कलेक्शन 68.96 कोटी झालं आहे. आज 17 जानेवारीला 'गुंटूर कारम' आणि 'हनुमान' यांनी रिलीजच्या सहाव्या दिवसात प्रवेश केला आहे.

'हनुमान' आणि 'गुंटूर कारम' चित्रपटाबद्दल : 'हनुमान' चित्रपटामध्ये तेजा सज्जाशिवाय अमृता अय्यर , वरलक्ष्मी सारथकुमार, विनय राय, वेन्नेला किशोर, दीपक शेट्टी, सत्या, गेटअप श्रीनु आणि इतर काही कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केलं आहे. दुसरीकडे महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम' चित्रपटामध्ये श्रीलीला, मीनाक्षी चौधरी, ब्रह्मानंदम, रम्या कृष्णन, जगपती बाबू, प्रकाश राज, जयराम, मुकेश ऋषी, आशीष विद्यार्थी, रेखा, सुनील आणि रघु बाबू हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केलंय. या चित्रपटाकडून महेश बाबूला खूप अपेक्षा आहेत.

हेही वाचा :

  1. विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझ स्टारर 'दो और दो प्यार'चं फर्स्ट लूक रिलीज
  2. रिचा चड्ढाने घेतला फ्लाइट विलंबाचा कटू अनुभव, एअरलाइन्समधील मक्तेदारीला दिला दोष
  3. 'खो गए हम कहाँ' सक्सेस पार्टीत चमकले अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.