मुंबई - Hanuman tickets : तेजा सज्जा स्टारर 'हनुमान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 10 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे निर्माते राम मंदिर ट्रस्टला 14 लाख रुपये दान केले असल्याचं समजत आहे. 'हनुमान' चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केलं आहे. हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. प्रशांत वर्मा यांनी चित्रपटाबाबत सांगितलं की, ''आम्ही चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटावर 5 रुपये देणगी देणार असल्याचं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच जाहीर केलं होतं. चित्रपट चालेल की नाही, या चित्रपटाचा व्यवसाय चांगला होईल की नाही याचा विचार न करता आम्ही हा निर्णय घेतला होता. पण यानंतर, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आम्ही ओपनिंग डे कलेक्शनमधून 14 लाख रुपये दान केले.''
प्रत्येक तिकिटावर पाच रुपये करणार दान : प्रशांत वर्मा पुढं म्हटलं, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच आम्ही प्रत्येक तिकिटातून 5 रुपये देणगी देण्याची योजना आखली होती. आम्ही हे चिरंजीवी सरांना सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही मंचावर याबद्दल घोषणा केली. आम्ही पहिल्या दिवसाच्या कमाईतून 14 लाख रुपये मंदिर ट्रस्टला दान करून आपले वचन पूर्ण केले आहे.'' हनुमान चित्रपटामध्ये तेजा सज्जाशिवाय अमृता अय्यर, वरलक्ष्मी शरत कुमार, विनय राय आणि राज दीपक शेट्टी हे देखील कलाकार आहेत. या चित्रपटात तेजा एका दलित व्यक्तीची भूमिका साकारत आहे, ज्याच्याकडे अनेक शक्ती आहेत आणि आता जग वाचवण्याचे काम त्याच्याकडे आहे.
'या' सेलिब्रिटींना राम मंदिराच्या अभिषेकासाठी आमंत्रित केले गेले : 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जल्लोषात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आलं होतं. पारंपारिक नगर शैलीत बांधलेले राम मंदिर परिसर 380 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 161 फूट उंच असेल. आता या सोहळ्याची वाट अनेकजण आतुरतेनं पाहात आहेत.
हेही वाचा :