ETV Bharat / entertainment

'सालार'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडाही गाठू शकले नाहीत साऊथ सुपरस्टार्सचे 6 चित्रपट - गुंटूर कारम

Box Office : साऊथ चित्रपटसृष्टीमधील चित्रपट 2024मध्ये बॉक्स ऑफिसवर धमाल करताना दिसत आहेत. 12 जानेवारीला 'गुंटूर कारम', हनुमान, कॅप्टन मिलर, आयलन, मिशन चॅप्टर 1 आणि' मेरी ख्रिसमस' हे चित्रपट रिलीज झाले, दरम्यान या सहा चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी कमाईच्याबाबतीत 'सालार' मागे टाकू शकले नाहीत.

Box Office
बॉक्स ऑफिस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 3:33 PM IST

मुंबई - Box Office : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर राज्य करताना दिसत आहे. 12 जानेवारीला 'गुंटूर कारम', 'हनुमान', 'कॅप्टन मिलर', 'आयलन', 'मिशन चॅप्टर 1' आणि 'मेरी ख्रिसमस' हे चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज झाले. बॉक्स ऑफिसवर एकत्र रिलीज झालेले चित्रपट एकमेकांच्या कलेक्शनवर चांगलाच प्रभाव टाकताना दिसत आहेत. साऊथ अभिनेता प्रभास स्टारर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट 'सालार पार्ट 1 सीझफायर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रम केला आहे. या चित्रपटानं जगभरात पहिल्या दिवशी जितकी कमाई केली तितकी कमाई हे सहा चित्रपट मिळून करू शकले नाहीत. या सर्व चित्रपटांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली आणि ते 'सालार'पेक्षा किती मागे आहेत, जाणून घेऊ या.

  • 3 years of sweat, blood and sacrifice from my team to you all. Captain Miller from today 🙏🏻🙏🏻. OM NAMASHIVAYAA ♥️♥️ pic.twitter.com/OtIoE3Dgtv

    — Dhanush (@dhanushkraja) January 11, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

12 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या चित्रपटांचे ओपनिंग डे कलेक्शन

अभिनेता महेश बाबूचा 'गुंटूर कारम' - 44.50 कोटी (तेलुगू)

अभिनेता धनुषचा 'कॅप्टन मिलर' - 8.65 कोटी (तमिळ)

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस' - 2.55 कोटी (हिंदी, तमिळ)

तेजा सज्जाचा 'हनुमान' - 7.56 कोटी (तेलुगू)

अभिनेता शिवकार्तिकेयनचा 'आयलान' - 7 कोटी (तमिळ)

अभिनेता अरुण विजयचे 'मिशन चॅप्टर 1' - 6.10 कोटी (तमिळ)

'सालार'ची कमाई : या सर्व चित्रपटांचे ओपनिंग डे कलेक्शन 76.36 कोटी रुपये आहे. प्रभास स्टारर 'सालार पार्ट 1 सीझफायर'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत 90 कोटीची कमाई केली होती. केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शितअ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट 'सालार पार्ट 1 सीझफायर' 22 डिसेंबर 2023 रोजी जगभरात प्रदर्शित झाला. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं जगभरात पहिल्या दिवशी 178.7 कोटींची कमाई केली. ' सालार' आज 13 जानेवारी रोजी रिलीजचा 22 वा दिवस आहेत. 21 दिवसांत या चित्रपटानं एकूण कलेक्शन देशांतर्गत 401.60 कोटी केलं तर जगभरात 705 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं रिलीजच्या 21व्या दिवशी 1.95 कोटीची कमाई केली आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 17'च्या 'वीकेंड का वार'मध्ये करण जोहरनं दिला अंकिता लोखंडेला पाठिंबा
  2. दुबईच्या रस्त्यावर रहमानच्या परदेशी फॅनने गायले 'मां तुझे सलाम', व्हिडिओ व्हायरल
  3. महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली जबरदस्त कामगिरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.