ETV Bharat / entertainment

महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली जबरदस्त कामगिरी - बॉक्स ऑफिस

Guntur Kaaram Collection Day 1 : 'गुंटूर कारम' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कामगिरी करत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 70 कोटीहून अधिक कमाई केली आहे.

Guntur Kaaram Collection Day 1
गुंटूर कारम कलेक्शन दिवस १
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 11:47 AM IST

मुंबई - Guntur Kaaram Collection Day 1 : 'गुंटूर कारम' 12 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज होताचं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. 'गुंटूर कारम'चं दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केलं आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी 50 कोटींचा व्यवसाय करू शकतो, असा अंदाजही वर्तवला जात होता. 'गुंटूर कारम'नं पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग करून सनी देओलच्या 'गदर 2'लाही मागे टाकले आहे. सॅकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार 'गदर 2'च्या पहिल्या दिवसाचे जगभरातील कलेक्शन 40.10 कोटी रुपये आहे, तर महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 42 कोटीची कमाई देशांतर्गत केली. या चित्रपटानं जगभरात 75 कोटीची कमाई केली आहे.

'गुंटूर कारम' चित्रपटाचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग : 'गुंटूर कारम' आणि कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर 'मेरी ख्रिसमस' चित्रपट एकच दिवशी रिलीज झाले. 'गुंटूर कारम' हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने करोडो रुपयांची कमाई केली आहे. सॅकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार पहिल्याच दिवशी देशभरात 11 लाख 11 हजार 772 रुपयांची तिकिटे विकल्या गेली होती. 'गुंटूर कारम'नं अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे 24.79 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचा प्रचंड क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे.

'गुंटूर कारम' चित्रपटाची स्टार कास्ट : एस. हरिका आणि हसीन क्रिएशन्स निर्मित 'गुंटूर कारम' या चित्रपटामध्ये महेश बाबू व्यतिरिक्त श्रीलीला, मीनाक्षी चौधरी, ब्रह्मानंदम, जगपती बाबू, रम्या कृष्णन, प्रकाश राज, मुकेश ऋषी, आशीष विद्यार्थी, सुनील, रघु बाबू, रेखा, जयराम आणि इतर कलाकार आहेत. 'गुंटूर कारम' चित्रपटाचे निर्माते स. राधा कृष्ण, सूर्यदेवरा नागा वंशी आहेत. या चित्रपटामध्ये महेश बाबू हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. हा चित्रपट तेलुगू हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड, पंजाबी प्रदर्शित झाला आहेत. 'गुंटूर कारम' चित्रपट 200 कोटी बजेटसमध्ये बनविण्यात आला आहे. या चित्रपटाकडून महेश बाबूला खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट लवकरच 100 कोटीची कमाई करेल अशी अपेक्षा सध्या केली जात आहे.

हेही वाचा :

  1. राम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
  2. "अ‍ॅनिमल हिंदी सिनेमासाठी गेम चेंजर" म्हणत, संदीप रेड्डी वंगाच्या समर्थनार्थ उतरला अनुराग कश्यप
  3. रणबीर कपूर स्टारर रामायण चित्रपटाला होणार सुरुवात, नियोजनबद्ध शूटिंग शेड्यूल तयार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.