ETV Bharat / entertainment

महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम'नं देशांतर्गत 100 कोटीचा टप्पा केला पार - बॉक्स ऑफिस कलेक्शन

Guntur Kaaram box office Day 6: महेश बाबू अभिनीत 'गुंटूर कारम' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटानं देशांतर्गत 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे.

Guntur Kaaram box office Day 6
गुंटूर कारम बॉक्स ऑफिस दिवस 6
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 11:15 AM IST

Updated : Jan 18, 2024, 11:30 AM IST

मुंबई - Guntur Kaaram box office Day 6: साऊथ अभिनेता महेश बाबूचा नुकताच प्रदर्शित झालेला अ‍ॅक्शनपट 'गुंटूर कारम' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी जगभरात 94 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आजवर या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट जगभरातील 200 कोटींच्या दिशेनं वाटचाल करत आहे. आज, 18 जानेवारीला हा चित्रपट रिलीजच्या सातव्या दिवसात प्रवेश करत आहे. दरम्यान, या चित्रपटानं सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेऊ या.

'गुंटूर कारम'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी देशांतर्गत 41.3 कोटीचा व्यवसाय केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी 13.55 कोटी, तिसऱ्या दिवशी 14.05 कोटी, चौथ्या दिवशी 14.1 कोटी, पाचव्या दिवशी 10.95 कोटी आणि सहाव्या दिवशी 7 कोटींची कमाई केली. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 100.95 कोटी झालं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 12 जानेवारी रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर एक आठवडा पूर्ण होण्याआधीच या चित्रपटानं 100 कोटी रुपयांचे देशांतर्गत कलेक्शन केले आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर वेगानं कमाई करत आहे.

'गुंटूर कारम' चित्रपटाबद्दल : त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित 'गुंटूर कारम' या चित्रपटामध्ये महेश बाबूशिवाय श्रीलीला, मीनाक्षी चौधरी, ब्रह्मानंदम, रम्या कृष्णन, जगपती बाबू, प्रकाश राज, जयराम, मुकेश ऋषी, आशीष विद्यार्थी, रेखा, सुनील आणि रघु बाबू हे कलाकार आहेत. या चित्रपटामध्ये महेश बाबूनं जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स दिले आहेत. हा चित्रपट 200 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित झाला आहे. रुपेरी पडद्यावर 'गुंटूर कारम' तेलुगू , हिंदी, मल्याळम, कन्नड, तमिळ, पंजाबी या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहेत. या चित्रपटाकडून महेश बाबूला खूप अपेक्षा आहेत, कारण त्याचा 2023 साली कुठलाही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला नाही. आता अनेकांच्या नजरा या चित्रपटाच्या एकूण कमाईवर आहेत.

हेही वाचा :

  1. 'इंडियन 2' ते 'थंगलान'सारखे अतिभव्य चित्रपट झळकणार ओटीटीवर
  2. पंतप्रधान मोदींनी भाजपचे राज्यसभा खासदार सुरेश गोपीच्या मुलीच्या लग्नाला लावली हजेरी
  3. 'फायटर' चित्रपटातील खलनायकाचं फर्स्ट लुक पोस्टर रिलीज

Last Updated : Jan 18, 2024, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.