मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या आगामी त्याच्या ''घर- बंदूक- बिरयानी'' चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचा टिझर यापूर्वी प्रसिध्द झाल्यापासून चित्रपटाबद्दलचीउत्सुकता वाढली होती. नागराजने फेसबुक लाईव्ह करत आपल्या सर्व कलाकारांची मुलाखत घेतली व चाहत्यांशी संवाद साधला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
त्याच्या 'आटपाट' प्रॉडक्शनच्या नव्या सिनेमाची घोषणा काही दिवसापूर्वी झाली होती. ''घर- बंदूक- बिरयानी'' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वतः नागराज भूमिका करणार असून 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत.
शुटिंगच्या शेवटच्या दिवशी सर्व कलाकारांसोबत नागराज स्वतः चाहत्यांशी बोलत होता. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्याने दिली. सयाजी शिंदे, आकाश ठोसर यांनी चित्रपट कधी एकदा तयार होतोय याची उत्कंठा व्यक्त केली. कलाकरासोबतच या लाईव्हमध्ये सर्व तंत्रज्ञ उपस्थित होते. हा जबरदस्त चित्रपट असल्याचे सर्वांनीच सांगितले.
टीझरमुळे वाढली होती उत्कंठा - नागराजने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर काही दिवसापूर्वी प्रसिध्द केला होता. टिझरची सुरुवात जंगलातील धमाक्याने होते. पोलीस आणि गुढ डाकू यांच्यात संघर्ष, चमकमक दिसते. परंतु ते लोक कोण आहेत याचा उलगडा झालेला नाही. ''घर- बंदूक- बिरयानी'' असे वेगळे शीर्षक असलेल्या या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट आहे हे टिझरवरुन निश्चित वाटत आहे.
झी स्टुडिओज आणि नागराजची हा चित्रपट संयुक्त निर्मिती असणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार आहेत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र. त्यांनी यापूर्वी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत जंगल औताडे यांनी केले आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज होणार आहे.
हेही वाचा - हातातून रक्तस्त्राव होत असताना अमिताभ यांनी केले होते शुटिंग, जयाप्रदाने सांगितला किस्सा