ETV Bharat / entertainment

गांधी गोडसेची शाहरुखच्या पठाण चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर - SRK

ख्यातनाम दिग्दर्शक राजकुमार संतोषी दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा चित्रपट निर्मिती करत असून ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज होतोय. यात नथूराम गोडसेची भूमिका चिन्मय मांडलेकर करत आहे. या चित्रटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला आहे.

गांधी गोडसेची शाहरुखच्या पठाणसोबत टक्कर
गांधी गोडसेची शाहरुखच्या पठाणसोबत टक्कर
author img

By

Published : Dec 27, 2022, 3:48 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार संतोषी एक दशकानंतर पुन्हा नव्या चित्रपटासह सज्ज झाले आहेत. ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातील नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चिन्मयने त्याच्या सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत चिन्मयने याबद्दल माहिती दिली आहे. या पोस्टरवरून हा चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांची हत्या करणारा नथूराम गोडसे यांच्यातील वैचारिक वाद दाखवणारा चित्रपट असेल असे वाटते.

विशेष म्हणजे ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या पोस्टरवर रिलीज तारीख २६ जानेवारी २०२३ जाहीर करण्यात आली आहे. नेमके याच वेळी पठाण हा शाहरुख खानचा चित्रपट रिलीज होत आहे. पठाणमधून शाहरुख चार वर्षानंतर पुनरागमन करतोय तर त्याची टक्कर राजकुमार संतोषीच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटासोबत होणार आहे. सध्या पठाण या चित्रपटाची खूप चर्चा आहे. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणीही समाजातील एक गट करत आहे. हाच गट ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाला पाठींबा देऊ शकतो. त्यामुळे दोन्ही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होऊ शकते.

एकापाठोपाठ एक सिनेमे पडल्यावर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता शाहरुख खान तब्बल चार वर्षांच्या गॅपनंतर 'पठाण' (Pathan Movie) मधून मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. हा एक थक्क करायला लावणाऱ्या अ‍ॅक्शनने परिपूर्ण असा चित्रपट असून त्यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आतापर्यंत कधीही न दिसलेल्या रूपात दिसणार आहे, तर शाहरुख जॉन अब्राहमच्या विरोधात उभा ठाकलेला दिसणार असून चांगल्या आणि वाईटाचा थरारक संघर्ष यातून दिसेल.

पठाण चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग प्रदर्शित झाल्यानंतर यातील दीपिका पदुकोणच्या बिकनीच्या रंगावरुन मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर शाहरुखला अनेक धमक्याही मिळत आहेत. मात्र त्याने चित्रपटाचे प्रमोशन नियोजनानुसार सुरु ठेवले असून चित्रपटाचे दुसरे गाणेही रिली झालंय. जबरदस्त लोकेशन्स, रंगबिरंगी बॅकग्राऊंड डान्सर्सचा समुदाय आणि शाहरुख आणि दीपिकाच्या तालबद्ध मुव्हमेंट्स यांनी गाण्यात धमाल केली आहे. प्रत्येकाला थिरकण्याची इच्छा होईल असे हे गाणे झाले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी बॉस्को सिझर या मास्टरची आहे. गीतकार कुमारने लिहिलेल्या या गाण्याला विशाल आणि शेखरच्या संगीताला अरजित सिंग, सुक्रिती कक्कर, विशाल आणि शेखर यांनी स्वरसाज चढवला आहे.

शाहरुखचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यास उत्सुक झाले असून चित्रपटाला विरोध होत असतानाही चाहते मात्र यश मिळवून देण्यासाठी सक्रिय आहेत. त्यामुळे पठाणची टक्कर ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटासोबत झाली तर यश कोणाच्या पदरात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - प्रभासचा सालार आहे 'राक्षसी', होणार 'केजीएफपेक्षाही मोठा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.