मुंबई - चित्रपट उद्योग क्षेत्रात नवे प्रयोग होत असताना एका मोठ्या ग्रुपने मीडिया हाऊस उघडण्याचा निर्णय घेतला आहे. गंधार ग्रुप आता फिल्म निर्माण उद्योगात प्रवेश करणार आहे. भारतात यशराज फिल्म्स, धर्मा प्रॉडक्शन, रेड चिलीज, लायका प्रॉडक्शन अशा काही नामांकित फिल्म निर्मिती कंपन्या कार्यरत असताना या स्पर्धेत उतरण्याची तयारी गंधार ग्रुपने केली आहे.
गंधार ग्रुप हा गेली ३० वर्षे मॅन्यूफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आता हा ग्रुप मीडिया आणि एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करत आहे. मीडिया आणि एन्टरटेन्मेंट विभागाला गंधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ओळखले जाणार, असल्याचे ट्रेड विस्लेषक तरण आदर्श यांनी केलेल्या लेटेस्ट ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
GANDHAR GROUP FORAYS INTO ENTERTAINMENT INDUSTRY… With around 30 years into the manufacturing industry, #GandharGroup has now ventured into the media and entertainment industry... The media and entertainment division is called Gandhar Films & Studio P Ltd. pic.twitter.com/dMUPdl7lAt
— taran adarsh (@taran_adarsh) January 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">GANDHAR GROUP FORAYS INTO ENTERTAINMENT INDUSTRY… With around 30 years into the manufacturing industry, #GandharGroup has now ventured into the media and entertainment industry... The media and entertainment division is called Gandhar Films & Studio P Ltd. pic.twitter.com/dMUPdl7lAt
— taran adarsh (@taran_adarsh) January 19, 2023GANDHAR GROUP FORAYS INTO ENTERTAINMENT INDUSTRY… With around 30 years into the manufacturing industry, #GandharGroup has now ventured into the media and entertainment industry... The media and entertainment division is called Gandhar Films & Studio P Ltd. pic.twitter.com/dMUPdl7lAt
— taran adarsh (@taran_adarsh) January 19, 2023
तरण आदर्श यांनी गंधार ग्रुपने प्रसिध्दीसाठी दिलेले निवेदनही ट्विटमध्ये जोडले आहे. यामध्ये ज्या प्रोजेक्टवर प्रॉडक्शन हाऊस काम करणार याबद्दलचा तपशीलही दिला आहे.
दुसऱ्या ट्विटमध्ये तरण आदर्श यांनी लिहिलंय, सध्या गंधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने निर्माणाधिन असलेल्या प्रोजेक्टमध्ये विशाल पंड्या दिग्दर्शित द गेम ऑफ गिरगिट आणि सोहम शाह दिग्दर्शित वेब सिरीज कार्तम भुगतम ही ओटीटीसाठी बनवली जाणार आहे. कंपनीच्यावतीने अनेक प्रोजेक्टची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
-
Current projects of Gandhar Films & Studio P Ltd are #TheGameOfGirgit [Director: #VishalPandya] and #KartamBhugtam [Director: #SohamShah]… Web series, commercial films and #OTT content will be made… Multiple projects will be announced soon.
— taran adarsh (@taran_adarsh) January 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Current projects of Gandhar Films & Studio P Ltd are #TheGameOfGirgit [Director: #VishalPandya] and #KartamBhugtam [Director: #SohamShah]… Web series, commercial films and #OTT content will be made… Multiple projects will be announced soon.
— taran adarsh (@taran_adarsh) January 19, 2023Current projects of Gandhar Films & Studio P Ltd are #TheGameOfGirgit [Director: #VishalPandya] and #KartamBhugtam [Director: #SohamShah]… Web series, commercial films and #OTT content will be made… Multiple projects will be announced soon.
— taran adarsh (@taran_adarsh) January 19, 2023
दरम्यान, सोहम शाह दिग्दर्शित वेब सिरीज कार्तम भुगतम या वेब सिरीजमध्ये नामवंत बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे झळकणार असल्याचे संकेत आहे. श्रेयस बुलेट या दुचाकीवरुन जात असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्याच्या कॅप्शनमध्ये कार्तम भुगतम असे हॅशटॅगसह लिहिले आहे.
-
*Dugg Dugg Dugg Dugg Dugg Dugg Dugg Dugg*….that sound. Can you hear it too??#KartamBhugtam pic.twitter.com/Jp1AmdiCLX
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) October 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">*Dugg Dugg Dugg Dugg Dugg Dugg Dugg Dugg*….that sound. Can you hear it too??#KartamBhugtam pic.twitter.com/Jp1AmdiCLX
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) October 26, 2022*Dugg Dugg Dugg Dugg Dugg Dugg Dugg Dugg*….that sound. Can you hear it too??#KartamBhugtam pic.twitter.com/Jp1AmdiCLX
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) October 26, 2022
कोण आहे सोहम शाह - सोहम शाह हा एक भारतीय अभिनेता, निर्माता आणि उद्योजक आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. त्याने 2009 मध्ये बाबर या चित्रपटाद्वारे त्याची पहिली आणि पडद्यावर भूमिका साकारली. त्याच्या पदार्पणानंतर सोहम शाहने तलवार (2015) आणि सिमरन (2017) मध्ये काम केले. त्याच्या तुंबाड या चित्रपटाला समीक्षकांची जोरदार प्रशंसा मिळाली.
उत्तम आशयावर आधारित चित्रपट तयार करण्यासाठी त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस, रिसायकलवाला फिल्म्स सुरू केले. त्यांचा पहिला चित्रपट होता समीक्षकांनी प्रशंसनीय शिप ऑफ थिसियस, जिथे त्यांनी सामाजिकदृष्ट्या अज्ञात स्टॉक ब्रोकरची भूमिका केली होती. शिप ऑफ थिसिअससाठी त्याला सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर, त्याला 2008 च्या नोएडा दुहेरी हत्याकांडावर आधारित मेघना गुलजारच्या तलवारमध्ये पोलिसाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली. 2017 मध्ये, शाहला हंसल मेहताच्या सिमरनमध्ये कंगना राणौतसोबत कास्ट करण्यात आले होते. आणि शाह या प्रकल्पावर 6-7 वर्षे काम केले, त्याचा आजपर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता तुंबाड, 12 ऑक्टोबर 2018 रोजी हा चित्रपट रिलीज झाला आणि समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सारखीच प्रतिक्रिया मिळवली. सध्या तो पुन्हा एकदा दिग्दर्शन करत असून कार्तम भुगतम या वेब सिरीजची तो निर्मिती करत आहे.
हेही वाचा - Princess Diana's Necklace Auction : किम कर्दाशियनने २ लाख डॉलर्सला खरेदी केला प्रिन्सेस डायनाचा नेकलेस