ETV Bharat / entertainment

Gadar 2 vs OMG 2 box office day 20: 'गदर 2'चे कलेक्शन 500 कोटींच्या जवळ, 'ओएमजी 2'ने पार केला 130 कोटींचा आकडा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 6:59 PM IST

'गदर 2' आणि 'ओएमजी 2' हे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. 'गदर 2' हा चित्रपट 500 कोटी आकडा पार करण्यास काही पावले दूर आहे. याशिवाय 'ओएमजी 2' हा चित्रपट 150 चा आकडा गाठण्यासाठी अजूनही बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे.

Gadar 2 vs OMG 2
गदर 2 आणि ओएमजी 2

मुंबई : सनी देओल स्टारर 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या राज्य करत आहे. हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली. 'गदर 2' च्या तुलनेत 'ओएमजी 2'ने बॉक्स ऑफिसवर कमी कमाई केली आहे. 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर कहर केला आहे. हा चित्रपट रिलीजच्या विसाव्या दिवशी देखील चांगली कमाई करत आहे. 'गदर 2' 500 कोटीचा आकडा पार करण्यास काही पावले दूर आहे. तर 'ओएमजी 2' हा 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी धडपडत करत आहे. या दोन्ही चित्रपटाने रिलीजच्या विसाव्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेऊया...

'गदर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'गदर 2'ने तिसर्‍या शुक्रवारी 7.10 कोटी, तिसर्‍या शनिवारी 13.75 कोटी, तिसर्‍या रविवारी 16.10 कोटी, तिसर्‍या सोमवारी 4.60 कोटी, तिसर्‍या मंगळवारी. 5.09 कोटी कमावले. हा चित्रपट तिसर्‍या बुधवारी 5.91 कोटी रुपये कमावण्याची अपेक्षा केली जात आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 471.65 कोटी होऊ शकेल. हा चित्रपट रोज अनेक रेकॉर्ड तोडत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' हा 2001 मधील सुपरहिट 'गदर: एक प्रेम कथा' चित्रपटचा सीक्वल आहे. 'गदर 2' चित्रपटात सनी देओल व्यतिरिक्त अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनीष वाधवा आणि गौरव चोप्रा हे प्रमुख भूमिकेत आहेत.

'ओएमजी 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन : अक्षय कुमार अभिनीत 'ओएमजी 2' हा सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत संघर्ष करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'ओ माय गॉड 2'ने तिसर्‍या सोमवारी म्हणजेच रिलीजच्‍या अठराव्‍या दिवशी 1.20 कोटींची कमाई केली. त्यानंतर एकोणीसव्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या मंगळवारी 1.31 कोटीची कमाई केली आहे. त्यानंतर आता हा चित्रपट विसाव्या दिवशी 1.50 कमाई करू शकतो, अशी अपेक्षा केली जात आहे. यासह या चित्रपटाचे अंदाजे एकूण कलेक्शन 139.93 होईल. 'ड्रीम गर्ल 2' आणि 'गदर 2'मुळे 'ओ माय गॉड 2'च्या कमाईवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा :

  1. Kanhaiya Twitter Pe Aja: विकी कौशल बनला भजन कुमार, 'द ग्रेट इंडियन फॅमिली'तील 'कन्हैया ट्विटर पे आजा' गाणे रिलीज
  2. Shreya Ghoshal in Indian Idol : इंडियन आयडॉलमध्ये 'स्पर्धक ते परीक्षक' प्रवास झाल्याने श्रेया घोषाल स्वतःला मानते धन्य
  3. Mamata Banerjee in Mumbai : ममता बॅनर्जी रक्षाबंधनासाठी 'जलसा'वर जाणार, अमिताभ बच्चन यांनी दिलं निमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.