मुंबई : सनी देओल स्टारर 'गदर 2'ने पहिल्या दिवसापासून देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. तिसऱ्या वीकेंडलाही बंपर कलेक्शन करत चित्रपटाने 450 कोटींचा आकडा पार केला आहे. यासह 'गदर 2'ने शाहरुख खानच्या 'पठाण'चा विक्रमही मोडला आहे. अवघ्या 17 दिवसांत या चित्रपटाने 450 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. शाहरुख खानच्या 'पठाण'ने १८ दिवसांत हा आकडा गाठला होता. हा चित्रपट आता 500 कोटींच्या अगदी जवळ पोहचला आहे. 'गदर 2' रिलीजच्या 18 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या सोमवारी किती कोटींचा व्यवसाय करू शकतो ते जाणून घेऊया...
'गदर 2' रिलीजच्या 18व्या दिवशी किती कमाई करेल : 'गदर 2'मध्ये पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिनाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. 'गदर 2'ला भारतातच नाही तर जगात देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिलीज होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. या चित्रपटाची क्रेझ खूप पाहायला मिळत आहे. तिसऱ्या वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत बरीच वाढ झाली असून या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले. 'गदर 2'ने अतिशय जलद गतीने कमाई केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट तिसऱ्या सोमवारी 5 कोटी कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाची एकूण कलेक्शन 461.95 कोटी रुपयांवर असेल.
'ओ माय गॉड 2' ची कमाई : अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'ओ माय गॉड 2' हा चित्रपट तिसर्या सोमवारी, 1.66 कोटी कमाई करू शकते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप हळूहळू कमाई केली आहे. 'ओ माय गॉड 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच 'गदर 2'ला टक्कर दिली. 'गदर 2'सोबत संघर्ष केल्यामुळे या चित्रपटाला नुकसान झाले आहे. 'ओ माय गॉड 2' हा 2012 मधील 'ओ माय गॉड' चित्रपटाचा सीक्वल आहे. 'ओ माय गॉड'ने बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. 'ओ माय गॉड 2' चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम, पवन मल्होत्रा आणि रामायण फेम अरुण गोविल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा :