ETV Bharat / entertainment

Gadar 2 Vs OMG 2 : 'गदर २'सोबत 'ओ माय गॉड २' रिलीज करणे पडले महागात; बॉक्स ऑफिसवर कमाईत मोठी घसरण... - गदर २ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

सनी देओलचा 'गदर २' बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारचा 'ओ माय गॉड २' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर हळूहळू कमाई करत आहे. दरम्यान आता या दोन्ही चित्रपटांनी रिलीजच्या आठव्या दिवशी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी वाचा...

Gadar 2 Vs OMG 2
गदर २ आणि ओ माय गॉड २
author img

By

Published : Aug 19, 2023, 12:12 PM IST

मुंबई : सनी देओल स्टारर 'गदर २' आणि अक्षय कुमारचा 'ओ माय गॉड २' या वर्षातील सर्वाधिक मोठे चित्रपट आहेत. हे दोन्ही चित्रपट ११ ऑगस्ट रोजी एकत्र प्रदर्शित झाले. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून 'गदर २' बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड बनवत असताना, सनी देओलच्या चित्रपटासमोर 'ओ माय गॉड २' खूप कमी कमाई करत आहे. 'गदर २' हा भारतातच नाही तर परदेशात खूप कमाई करत आहे. 'गदर २'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तारा आणि सकिनाची ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहणे लोकांना एखाद्या मेजवानीसारखे आहे. त्याचबरोबर 'ओ माय गॉड २' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हळूहळू कमाई करत आहे. दरम्यान आता या चित्रपटांनी रिलीजच्या आठव्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला हे जाणून घेऊया...

'गदर २'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ८ : सनी देओलचा 'गदर २' दररोज नवे रेकॉर्ड करत आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 'गदर २' २००१ मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा'चा सीक्वल आहे. 'गदर २' च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने २८४.६३ कोटींचे कलेक्शन केले आहे. याशिवाय या चित्रपटाने रिलीजच्या आठव्या दिवशी किती कमाई केली याचे आकडे आता समोर आले आहेत. सकनिल्‍कच्‍या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार 'गदर २'च्‍या कमाईत आठव्‍या दिवशी १६.२४ टक्‍क्‍यांची घसरण नोंदवली गेली आहे. 'गदर २'ने १९.५ कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह, 'गदर २' ची ८ दिवसांची एकूण कमाई आता ३०४.१३ कोटी रुपयांवर गेली आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २'ने 'पठाण', 'दंगल', 'केजीएफ २', 'पीके' आणि 'द काश्मीर फाइल्स' यांना मागे टाकले आहेत.

'ओ माय गॉड २' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ८ : अक्षयच्या या चित्रपटाने ओपनिंग वीकेंड आणि स्वातंत्र्यदिनी खूप नोटा छापल्या असल्या तरी आता हा चित्रपट 'गदर २'च्या वादळासमोर टिकू शकलेला नाही. पंकज त्रिपाठी, अक्षय कुमार आणि यामी गौतम स्टारर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आता दररोज घट होत आहे. दरम्यान, आता 'ओ माय गॉड २' च्या आठव्या दिवसाचे कमाईचे आकडे समोर आले आहेत. सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, 'ओ माय गॉड २'ने रिलीजच्‍या आठव्‍या दिवशी ५.६ कोटी कमावले आहेत. यासह, 'ओ माय गॉड २'ची ८ दिवसांची एकूण कमाई आता ९०.६५ कोटी रुपयांवर गेली आहे. 'गदर २'ने ३०० कोटींचा टप्पा पार केला, मात्र ओ माय गॉड २' हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करू शकला नाही. आता दुसऱ्या आठवड्यात 'गदर २' आणि 'ओएमजी २' आणखी किती कमाई करेल हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. Box Office Collection : रजनीकांत स्टारर 'जेलर'ची कमाई घटली, जाणून घ्या आठव्या दिवसाचे कलेक्शन
  2. Gadar 2 vs OMG : सनी देओलचा 'गदर 2' 300 कोटींच्या जवळ तर अक्षय कुमारचा 'OMG 2' ने गाठला 100 कोटींचा आकडा...
  3. Urfi Javed receives death threats : उर्फी जावेदला मिळाली जीवे मारण्याची धमकी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.