ETV Bharat / entertainment

Gadar 2 trailer released : 'गदर २'च्या ट्रेलरने सोशल मीडियावर घातले धुमाकूळ..... - गदर २

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला चाहते खूप लाईक करत आहे. 'गदर २'च्या ट्रेलरने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातले आहे.

Gadar 2
गदर २
author img

By

Published : Jul 27, 2023, 11:27 AM IST

मुंबई : सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'गदर २' चित्रपटाची वाट प्रेक्षक खूप आतुरतेने पाहत आहे. दरम्यान, आता या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाले आहे. गदर २ चित्रपटाचा ट्रेलर हा सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे. ट्रेलर लाँचच्या निमित्ताने, २२ वर्षांनंतरही, सनी आणि अमिषा पटेलची सुंदर केमिस्ट्री आप पाहू शकतो. सनी आणि अमिषाचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर शेअर केले व्हिडिओ : पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अमीषा पटेल पुन्हा एकदा सुंदर लाल शरारात सकीनाच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर सनी देओल तारा सिंगच्या लूकमध्ये हँडसम दिसत आहे. तर दुसरीकडे ढोल-ताशांच्या गजरात ट्रेलर लॉन्चमध्ये दाखल झालेल्या या दोघांनाही चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. याशिवाय दुसऱ्या व्हिडिओमध्ये सकीना आणि तारा सिंगची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी दोघांचे कौतुक केले आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्याशिवाय उत्कर्ष शर्मा पुन्हा एकदा 'गदर २' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सिमरत कौर, मनीष वाधवा आणि लव सिन्हा हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ट्रेलर पाहून तुम्हाला धक्का बसेल : 'गदर २'च्या धमाकेदार ट्रेलरची सुरुवात एका संवादाने होते. यानंतर ट्रेलरमध्ये तारा आणि सकिना यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते, याशिवाय नंतर ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन सीन्स देखील पाहायला मिळतात. 'गदर २' मध्ये तारा पुन्हा एकदा पाकिस्तानला जातो आणि आपल्या मुलाला वाचवताना दिसतो. दरम्यान यावेळी चित्रपटाची कहाणी आणखी स्फोटक असणार आहे. चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'मैं निकला गड्डी लेके' ची काही झलकही यावेळी दाखविण्यात आली आहे. तसेच सिमरत कौरची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. हा ट्रेलर झी स्टुडिओने आपल्या इंस्टाग्राम ऑफिशियल अकाउंटवर शेअर केला आहे.

चित्रपटाचे ठळक मुद्दे : मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला, ज्यामध्ये चित्रपटाची स्टार कास्ट ट्रकमधून लॉन्चसाठी पोहोचली होती. यावेळी सनी देओल आणि अमिषा पटेल एकमेकांसोबत डान्स करताना दिसले. दोघांचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'गदर २'मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्याशिवाय उत्कर्ष शर्माही मुख्य भूमिकेत आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २' हा २००१ मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

चाहत्याच्या ट्रेलरच्या पोस्टवर कमेंट : चित्रपटाच्या ट्रेलरला युटुबवर १४ तासात ६१३,००० प्रेक्षकांनी लाईक केले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला पाहून चाहत्यांनी 'तारा सिंग ईज बॅक' म्हटले असून या ट्रेलरच्या पोस्टला लाईक केले आहेत. ट्रेलर पाहून एका चाहत्याने लिहले, 'लव्ह यू सनी पाजी' तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहले, 'खूप खास चित्रपट' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहे.

हेही वाचा :

  1. Ameesha Patel :अमिषा पटेलला कोर्टाने ठोठावला ५०० रुपयांचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण...
  2. Parineeti chopra and Raghav chadha : परिणीती चोप्राच्या होणाऱ्या नवऱ्यावर कावळ्याचा हल्ला, राघव चड्ढा ट्रोल
  3. Kam Chalu Hai! : राजपाल यादवचे सांगलीत 'काम चालू है!', मग क्रिकेटर स्मृती मंधानाचे काय डेटिंग चालू आहे?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.