ETV Bharat / entertainment

Gadar २ Success Party : 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीत दिग्गज बॉलिवूड कलाकारांची हजेरी; पाहा व्हिडिओ - Shah Rukh Khan

Gadar २ Success Party : सनी देओलने मुंबईत 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी 'गदर 2' चित्रपटाचे सर्वांनी कौतुक केले.

Gadar 2 Success Party
गदर 2 सक्सेस पार्टी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 10:58 AM IST

गदर 2 सक्सेस पार्टी

मुंबई - Gadar २ Success Party : सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीज होताच सर्व रेकॉर्ड मोडून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटाच्या यशामुळे कलाकारांपासून निर्मात्यांपर्यंत सगळेच खूश आहेत. चित्रपटाचे यश पाहून सनी देओलने मुंबईत 'गदर 2'ची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सलमान खानपासून कार्तिक आर्यनपर्यत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. या सक्सेस पार्टीत शाहरुख खानने पत्नी गौरीसोबत हजेरी लावली होती. त्यानंतर सनी देओल आणि शाहरुख खानने पापाराझींसमोर पोझही दिली. शाहरुख आणि सनीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

'गदर 2'ची सक्सेस पार्टी : 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध पॉवर कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी देखील एकत्र दिसले होते. या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे जोडपे ब्लॅक आउटफिटमध्ये हात धरून कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसले. 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीमध्ये सनी देओल त्याचा मुलगा करण देओल, त्याची पत्नी आणि भाऊ बॉबीसोबत पोझ देताना दिसला. पार्टीत निळ्या सूटमधील सनीने चाहत्यांची मने जिंकली. सलमान खान या पार्टीत मस्ती करताना दिसला. यावेळी त्याच्यासोबत कार्तिक आर्यनही होता. दोन्ही स्टार्सने हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोझ दिली.

बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी : याशिवाय सारा अली खान भाऊ इब्राहिम अली खानसोबत 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीत उपस्थित होती. या पार्टीत तिने गुलाबी रंगाचा फुल जंपसूट घातला होता. या ड्रेसमध्ये ती खूप खास दिसत होती. यावेळी तिने कार्तिक आर्यनला मिठीही मारली. याशिवाय सारा आणि कार्तिकच्या अफेअरच्या बातम्या देखील मीडियामध्ये येत होत्या. तसेच 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीत क्रिती सेनॉन, अजय देवगण, शिल्पा शेट्टी काजोल, वरुण धवन, शाहिद कपूर, अमिषा पटेल, आदित्य रॉय कपूर, सनी शेट्टी, संजय दत्त, अनन्या पांडे, विकी कौशल, आयुष शर्मा, अर्पिता आणि अनिल कपूर यांसारखे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी या सर्व कलाकारांनी 'गदर 2'चे कौतुक केले.

हेही वाचा :

  1. Rakhi Sawant On Religion : आदिल खान दुर्रानी आणि राखी सावंतच्या वादावर अर्शी खानची खास मुलाखत...
  2. Rubina Dilaik Pregnancy Confirms : रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लाच्या घरी होणार नव्या पाहुण्याचे आगमन?
  3. Subhash Ghai recalls Shikhar : शाहरुखसह शिखर चित्रपटाचा केला होता मुहूर्त, सुभाष घईंनी सांगितला न बनलेल्या सिनेमाचा किस्सा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.