मुंबई : सनी देओल स्टारर 'गदर २' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडला जबरदस्त कलेक्शन करून शाहरुख खानचा 'पठाण', सलमानचा 'टायगर जिंदा है', 'केजीएफ'सह अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून दुहेरी अंकात कमाई केली आहे. रिलीजच्या १२व्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. हा चित्रपट १२ दिवसांत धमाकेदार कमाई करून वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. 'गदर २' मध्ये सनी देओलसोबत अमिषा पटेल मुख्य भूमिकेत दिसली असून त्यांची केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे.
'गदर २'ची कमाई : हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. ४०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्रीमुळे तो लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल अशी चाहते अपेक्षा करत आहेत. 'गदर २' ने बाराव्या दिवशी उत्तम कलेक्शन केले आहे. सकनिल्सच्या रिपोर्टनुसार, 'गदर २' ने १२व्या दिवशी जवळपास ११ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर या चित्रपटाने ४०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाने अकराव्या दिवशी १३.५० कोटींचा व्यवसाय केला होता. पहिल्या वीकेंडपर्यंत चित्रपटाने १३४ कोटींची कमाई केली होती. ज्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात मनीष वाधवा खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.
'गदर २' पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी : 'गदर २'मध्ये कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १२ दिवस झाले आहेत. पण तरीही चित्रपटगृहातील सर्व शो जवळपास हाऊसफुल्ल होत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही बऱ्यापैकी नोटा छापत आहे. शनिवारी चित्रपटाच्या कमाईत ५१.५६ टक्क्यांनी वाढ झाली. 'गदर २' हा २००१ मध्ये आलेल्या 'गदर : एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सीक्वल आहे. 'गदर २' बॉक्स ऑफिसवर 'जेलर' चित्रपटाला मागे टाकू शकतो आता असे दिसत आहे. कारण हा चित्रपट प्रत्येक दिवशीच १० कोटीपेक्षा जास्त कमाई करत आहे. या चित्रपटामधील गाणी खूप हिट झाल्यामुळे अनेक प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे वळत आहेत.
हेही वाचा :