मुंबई : सनी देओलचा 'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करत आहे. रिलीज होताच सनी पाजीच्या चित्रपटाने धुमाकूळ घातला. आता हा चित्रपट ४०० कोटी क्लबच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'गदर २'नं बॉक्स ऑफिसवर ११ दिवस पूर्ण केले आहेत. यासोबतच या चित्रपटाने चांगलीच कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. हा चित्रपट रिलीजच्या ११व्या दिवशी देखील जबरदस्त कमाई करत आहे. दरम्यान आता 'गदर २'ने बाकी दिवसापेक्षा कमी कमाी केली आहे. तरीही या चित्रपटाने २१ ऑगस्ट रोजी देशभरात बॉक्स ऑफिसवर ११व्या दिवशी म्हणजेच सोमवारी १४ कोटीची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या वीकेंडच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर 'गदर २'ने शुक्रवारी सुमारे २० कोटींचा व्यवसाय केला. तसेच शनिवारी ३१.०७ कोटी आणि रविवारी ३८.९० कोटी कमवले आहेत. यासह, 'गदर २'ने आत्तापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे ३८९.१० कलेक्शन केले आहे.
'गदर २'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
- १ दिवस - ४०.१० कोटी
- २ दिवस - ४३.०८ कोटी
- ३ दिवस - ५१.७० कोटी
- ४ दिवस - ३८.७० कोटी
- ५ दिवस - ५५.४० कोटी
- ६ दिवस - ३२.३७ कोटी
- ७ दिवस - २३.२८ कोटी
- ८ दिवस - २०.५० कोटी
- ९ दिवस - ३१.०७ कोटी
- १० दिवस - ३८.९० कोटी
- ११ दिवस - १४.०० कोटी
एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन - ३८९.१० कोटी
'गदर २' देशांर्तगत ४०० कोटी क्लबमध्ये कधी प्रवेश करणार? : 'गदर २' हा आता ४०० कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. हा चित्रपट मंगळवारी १० ते ११ कोटींची कमाई करू शकतो आणि ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. 'गदर २' जबरदस्त कलेक्शनसह रुपेरी पडद्यावर वर्चस्व गाजवत आहे. 'गदर २' हा २००१मध्ये आलेल्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सीक्वल आहे. 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रोजच रेकॉर्ड तोडत आहेत.
हेही वाचा :