ETV Bharat / entertainment

Gadad Andhar Movie Teaser : 'गडद अंधार'-'द वे ऑफ वॅाटर', रोमांचक टिझर प्रदर्शित! - Gadad Andhar The Way of Water

'गडद अंधार'-'द वे ऑफ वॅाटर' (Gadad Andhar The Way of Water) चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचे विश्व दाखवण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचे दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे.(gadad andhar teaser out)

Gadad Andhar Movie Teaser
'गडद अंधार'-'द वे ऑफ वॅाटर', रोमांचक टिझर प्रदर्शित!
author img

By

Published : Dec 21, 2022, 2:18 PM IST

मुंबई : जागतिक चित्रपटांमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते आणि त्यामुळे मनोरंजनाची पातळी उंचावलेली दिसते. नुकताच प्रदर्शित झालेला 'अवतार : द वे ऑफ वॅाटर' (Gadad Andhar The Way of Water) याची ग्वाही देऊ शकतो. खरेतर पाणी आणि मानवी जीवन यांचे नाते अतूट आहे. हे नाते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अवतार : द वे ऑफ वॅाटर' या हॅालिवूड चित्रपटाद्वारे अधोरेखित करण्यात आले आहे. अश्याच प्रकारचे नाते आगामी मराठी चित्रपट 'गडद अंधार' यातून दर्शवण्यात आले आहे. पाण्याखालचे विश्व दाखवणाऱ्या या चित्रपटात विस्मयचकित करणारे रहस्य दडलेले आहे. ( Gadad Andhar Movie Teaser )

Gadad Andhar Movie Teaser
'गडद अंधार'-'द वे ऑफ वॅाटर', रोमांचक टिझर प्रदर्शित!

सुपर नॅचरल थ्रीलर : या चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचे विश्व दाखवण्यात आले आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचे दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात नेमके काय पहायला मिळणार याबाबतचे कुतूहल जागे करणाऱ्या या टिझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सिनेप्रेमींद्वारे 'गडद अंधार'चा टिझर शेअर करण्यात येत आहे. (gadad andhar teaser out)

थरार आणि भय यांचा संगम : 'गडद अंधार' या अनोख्या टायटलमुळे चर्चेत असलेल्या या थ्रिलरपटाचा टिझरही अतिशय रोमांचक आहे. पाण्यात उडी मारण्यापूर्वी बोटीत असलेला नायक-नायिका, समुद्राच्या तळाशी अंधाऱ्या गुहेत जाण्याचा त्यांचा प्रयत्न, पाण्याखालचे मनमोहक दृश्ये टिपणारा कॅमेऱ्याची जादू 'गडद अंधार'च्या टिझरमध्ये पहायला मिळते. खऱ्या अर्थाने रोमांचक चित्रपटाची झलक दाखवणारा असा हा टिझर आहे. आजवर कधीही न पाहिलेले कथानक आणि अलौकीक विश्वावर 'गडद अंधार' हा चित्रपट प्रकाशझोत टाकणार आहे. थरार आणि भय यांचा संगम घडवणारा टिझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

अंधारात प्रेक्षकांना कोणता प्रकाशकिरण दिसणार : 'इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी 'गडद अंधार' या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'गडद अंधार' हा चित्रपट मराठी रसिकांना खऱ्या अर्थाने एक वेगळा अनुभव देणारा असल्याचे सांगत दिग्दर्शक प्रज्ञेश कदम म्हणाले की, या चित्रपटाचा टिझर खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा आहे. याद्वारे रसिकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाताना 'गडद अंधार'च्या टिमला खूप आनंद होत आहे. 'गडद अंधार' या टायटलमधील अंधारात प्रेक्षकांना कोणता प्रकाशकिरण दिसणार आणि त्यातून कथानकातील कोणते पैलू उलगडणार हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी या चित्रपटासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.

महत्त्वपूर्ण भूमिका : 'एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३'चा विजेता तसेच 'बिग बॅास' फेम जय दुधाणे (Jay Dudhane), नेहा महाजन (Neha Mahajan), शुभांगी तांबाळे, आकाश कुंभार आदी कलाकारांनीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे लेखन प्रज्ञेश कदम, लौकिक आणि चेतन मुळे यांनी केले असून, पार्श्वगायक व संगीतकार रोहित राऊतने 'गडद अंधार'मधील गाण्यांना संगीत देण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. प्रवीण वानखेडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, आदिनाथ पातकर यांनी गाण्याची व्यवस्था केली आहे. सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.