ETV Bharat / entertainment

Movies and web series list : ऑक्टोबर 2023 मध्ये कुठले बॉलीवूड चित्रपट आणि वेब-सीरीज प्रदर्शित होणार हे घ्या जाणून...

Movies and web series list :या महिन्यात तुम्हाला मनोरंजनाचा एक मेजवाणी मिळणार आहे.ऑक्टोबरमध्ये तुम्ही कोणते बॉलिवूड चित्रपट आणि वेब-सीरीज कुठे पाहू शकता हे जाणून घेण्यासाठी खालील लिस्ट पाहा....

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 12:31 PM IST

Movies and web series list
चित्रपट आणि वेब सीरीजची लिस्ट

मुंबई - Movies and web series list : येत्या ऑक्टोबर महिन्यात तुम्ही येणार्‍या सणांसोबतच तुमचा मनोरंजनाचा कार्यक्रम सेट करू शकता. ऑक्टोबर महिन्यात मनोरंनाचा तडका तुम्हाला मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार्‍या बॉलीवूड चित्रपट आणि वेब-सीरीजची संपूर्ण यादी तुमच्यासाठी तयार आम्ही केली आहे. ऑक्टोबरमध्ये कुठले चित्रपट आणि वेबसीरिज तुमच्यासाठी सज्ज आहेत हे जाणून घेण्यासाठी वाचा...

दोनों : ​सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल हा 'दोनों' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांचा मुलगा अविनाश बडजात्या यांनी केले आहे. तसेच या चित्रपटामधून दिग्गज अभिनेत्री पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ढिल्लन देखील बॉलिवूडमध्ये एंट्री घेत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मिशन राणीगंज : ऑक्टोबरमध्ये 'मिशन राणीगंज' हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा स्टारर चित्रपट 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा अभियंता जसवंत सिंग गिलची भूमिका साकारणार आहे.

थैंक्यू फॉर कमिंग : 'थँक्स फॉर कमिंग' हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत भूमी पेडणेकर, शहनाज गिल आणि कुशा कपिला या अभिनेत्री दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये अनेक कलाकर पाहायला मिळणार आहे. 'थँक्स फॉर कमिंग' चित्रपटामध्ये भूमी ही बोल्ड अवतारात प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे.

तेजस : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतचा 'तेजस' देखील ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना एअरफोर्स ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबरला रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवराने केले आहे.

गणपत : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट गणपत 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. 200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. 'गणपत' हा फ्युचरिस्टिक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर 29 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या खूप पसंतीला उतरला आहे.

यारियां २ : 'तेजस' आणि 'गणपत'सोबत दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि पर्ल व्ही पुरी स्टारर चित्रपट 'यारियां 2' देखील 20 ऑक्टोबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची वाट चाहत्या खूप आतुरतेनं पाहत आहे. यापूर्वी 10 जानेवारी, 2014 रोजी आलेला 'यारियां' हा चित्रपट खूप हिट झाला होता. आता या चित्रपटाकडून देखील दिव्याला खूप अपेक्षा आहे.

खूफिया : विशाल भारद्वाजचा 'खुफिया' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत. ही एक मनोरंजक ड्रामा थ्रिलर मालिका आहे, जी अमर भूषण यांच्या 'एस्केप टू नोव्हेअर' या गुप्तचर कादंबरीवर आधारित आहे.

सुल्तान ऑफ दिल्ली : 'सुल्तान ऑफ दिल्ली' ही अ‍ॅक्शन-थ्रिलर वेब रिलीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 13 ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार आहे. ही वेब सीरीज 1960 च्या दशकावर आधारित आहे. या वेब सीरीजचं दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले असून सुपरण वर्मा यांनी ही वेब सीरिज लिहिली आहे. या वेब सीरीजमध्ये ताहिर राज भसीन, मौनी रॉय, विनय पाठक आणि मेहरीन पिरजादा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

काला पानी : 'जस्सी जैसी कोई नहीं' फेम मोना सिंग स्टारर थ्रिलर 'काला पानी' हा अंदमान आणि निकोबार बेटांवर आधारित 18 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल, या वेब सीरिजमध्ये दुर्गम भागातील जीवन एका आजारामुळे धोक्यात येते, असे दाखविण्यात आले आहे. या वेब सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर आणि सुकांत गोयल यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. Aishwarya and Aaradhya spotted : ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन 'मायलेकी' अज्ञात स्थळी रवाना, विमानतळावर झाल्या स्पॉट
  2. Jackie Shroff felt proud : 'गणपथ'चा टीझर पाहून जॅकी श्रॉफला वाटला मुलाचा अभिमान, लिहिली हृदयस्पर्शी चिठ्ठी
  3. Mission Raniganj : कोळशाच्या खाणीत अडकलेल्या 57 कामगारांच्या सुटकेचा थरारक अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.