ETV Bharat / entertainment

लग्नानंतर आलिया भट्टच्या सांगण्यावरुन सर्वप्रथम रणबीर करणार हे काम - रणबीर आलियाचे लग्न कधी झाले

रणबीर कपूर आणि आलियाच्या विवाहाची धामधुम सुरू असतानाच एक नवी माहिती समोर येत आहे ज्यामुळे रणबीरचे चाहते खूश होतील. रणबीर सोशल मीडियावर सक्रिय नाही. त्यामुळे त्याचे फोटो, व्हिडिओ आणि इतर खथासगी गोष्टी चाहत्यापर्यंत पोहोचत नाहीत. आता मात्र पत्नी आलियाच्या आज्ञेचे पालन करीत रणबीर सोशल मीडियावर सक्रिय होणार आहे.

रणबीर-आलिया लग्न
रणबीर-आलिया लग्न
author img

By

Published : Apr 14, 2022, 12:21 PM IST

मुंबई - संपूर्ण कपूर कुटुंब गुरुवारी (१४ एप्रिल) बॉलीवूड शहरात रणबीर कपूरच्या लग्नाच्या वरातीसाठी सज्ज झाले आहे. यावेळी कपूर कुटुंबातील सर्व महिला घरामध्ये स्वत:ची सजावट करण्यात गुंतल्या आहेत. जवळपास तीन ते चार वर्षांच्या नात्यानंतर रणबीर-आलिया आज लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नानंतर रणबीर कपूर पत्नी आलिया भट्टची आज्ञा पाळत आजपर्यंत न केलेले काम करणार आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रणबीर कपूरला बॉलिवूडचा ब्रॉडकास्ट बॉय म्हटले जाते. तो सोशल मीडियावर (इन्स्टाग्राम इ.) नसला तरी त्याच्याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या बातम्या असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर लग्नानंतर इंस्टाग्रामवर डेब्यू करणार आहे. आलिया भट्टने यासाठी रणबीरला पटवले आहे.

आलियाने भावी पती रणबीर कपूरला सोशल मीडियावर चाहत्यांसाठी लग्नानंतर वैयक्तिक व्हिडिओ संदेश शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर सामील होण्यास सांगितले आहे. रिपोर्टनुसार, रणबीर-आलियाच्या मेहंदी सेरेमनीमध्ये आलिया आणि करण जोहर या आयडियाबद्दल बोलताना ऐकले होते.

रणबीर-आलियाच्या लग्नाला अत्यंत जवळचे लोक उपस्थित असणार आहेत. लग्नानंतर त्यांनी एका ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी पोहोचणार आहेत. 17 एप्रिल रोजी हे रिसेप्शन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असून, त्यामध्ये इंडस्ट्रीतील सर्व लोकांना आमंत्रणे पाठवली जाणार आहेत. बॉलिवूडच्या या बहुचर्चित लग्नासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. सर्व व्यवस्थित पार पडावे यासाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा - Alia Ranbir Wedding : आली लग्नघडी! आलिया रणबीर होणार आज विवाहबद्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.