ETV Bharat / entertainment

Surya movie : ‘सुर्या’ चित्रपटात एका नायकाविरुद्ध दिसणार पाच खलनायक!

आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांनाही पहायला आवडतो. आणि जर खलनायक एकापेक्षा जास्त असतील तर अजूनच बहार येते. आगामी सूर्या चित्रपटात तब्बल पाच खलनायक दिसून येणार आहेत. म्हणजेच चित्रपटाची मजा पाच गुणे वाढणार हे नक्की. ‘सुर्या’ (Surya Movie) या सगळ्या खलनायकांचा कसा प्रतिकार करतो हे प्रेक्षकांना चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे.

Surya movie
‘सुर्या’ चित्रपट
author img

By

Published : Nov 16, 2022, 4:07 PM IST

मुंबई: आपल्या चित्रपटांत नायकबरोबरच खलनायकही तगडा असावा लागतो. व्हिलन जितका खतरनाक तेवढीच हिरोची इमेज वरती. हिरो आणि व्हीलन ताकदीचे असतील तर त्यांच्यातील जुगलबंदी बघायला प्रेक्षकांनाही मजा येते. चित्रपटात मुख्य नायक - नायिकेइतकाच नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचाही महत्त्वाचा वाटा असतो. नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. आगामी सूर्या चित्रपटात तब्बल पाच खलनायक दिसून येणार आहेत. म्हणजेच चित्रपटाची मजा पाच गुणे वाढणार हे नक्की. ‘सुर्या’ या सगळ्या खलनायकांचा कसा प्रतिकार करतो हे प्रेक्षकांना चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे.

अभिनेत्यांची फौज खलनायकाच्या रुपात: आगामी ‘सुर्या’ या मराठी चित्रपटात मराठी-हिंदीतील सशक्त अभिनेत्यांची फौज खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. ‘सुर्या’ (Surya Movie) या चित्रपटाच्या नायकाचा सामना या सर्व खलनायकांशी होणार आहे. ‘सुर्या’ या चित्रपटात अखिलेन्द्र मिश्रा (Akhilendra Mishra), हेमंत बिर्जे (Hemant Birje), हॅरी जोश (Harry Josh), उदय टिकेकर (Uday Tikekar), गणेश यादव (Ganesh Yadav) ही मंडळी आपल्या खलप्रवृत्तीतून ‘सुर्या’ला बेजार करताना दिसतील. प्रसाद मंगेश (Prasad Mangesh) अभिनेता ‘सुर्या’च्या डॅशिंग भूमिकेत पहायला मिळणार आहे. हसनैन हैद्राबादवाला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

जिगरबाज कथा: समाजात दहशत पसरवत, क्रौर्याचे दर्शन घडवित हातातल्या सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करणाऱ्या खलनायकांना ‘सुर्या’ कसा समोरा जातो? याची जिगरबाज कथा ‘सुर्या’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते अखिलेन्द्र मिश्रा यात ‘नारूअण्णा’ या कुविख्यात गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रज्जाक’ या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्वातील डॉनची भूमिका हेमंत बिर्जे यांनी साकारली आहे. त्यासोबत हॅरी जोश हे ‘मुन्ना रेड्डी’ या डॉनच्या व्यक्तिरेखेत दिसतील. उदय टिकेकर हे तात्या पाटील या विरोधीपक्ष नेत्याच्या भूमिकेत पहायला मिळणार असून उदयसिंग मोरे ही खाकी वर्दीतल्या खलनायकाची भूमिका अभिनेता गणेश यादव यांनी साकारली आहे. अ‍ॅक्शन डिरेक्टर अब्बास अली मोघल आणि कौशल-मोझेस आहेत.

महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार: चित्रपटाची कथा मंगेश ठाणगे यांची तर पटकथा विजय कदम, मंगेश ठाणगे यांची आहे. संवाद विजय कदम, मंगेश केदार, हेमंत एदलाबादकर यांचे आहेत. संकलन राहुल भातणकर यांचे तर छायांकन मधु.एस.राव यांचे आहे. तर नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांचे आहेत. बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संजय मिश्रा, देव चौहान यांनी लिहिलेल्या गीतांना देव चौहान यांचे संगीत लाभले आहे. या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली असून सह निर्मिती प्रसाद मंगेश, चेतन मंगेश यांची आहे. कार्यकारी निर्माते संग्राम शिर्के आहेत. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा ‘सुर्या’ हा ऍक्शनपॅक्ड चित्रपट ६ जानेवारीला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.