ETV Bharat / entertainment

'फायटर'मधील 'इश्क जैसा कुछ' गाणं लॉन्च, दीपिका आणि हृतिकच्या केमेस्ट्रीची चाहत्यांना भुरळ - इश्क जैसा कुछ गाणं

Fighter song Ishq Jaisa Kuch out: दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन अभिनीत 'फायटर'मधील दुसरे रोमँटिक गाणे आता लॉन्च झाले आहे. विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनी संगीतबद्ध केलेले हे 'इश्क जैसा कुछ', गाणे दीपिका आणि हृतिकच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी आहे. कारण यामध्ये दोघांची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.

Fighter song Ishq Jaisa Kuch out
'फायटर'मधील 'इश्क जैसा कुछ' गाणं लॉन्च
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 22, 2023, 4:42 PM IST

मुंबई - Fighter song Ishq Jaisa Kuch out: दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन अभिनीत आगामी 'फायटर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील दुसरे गाणे लॉन्च केले. 'शेर खुल गए' या हाय-एनर्जी पार्टी अँथमनंतर 'फायटर'मधील 'इश्क जैसा कुछ' हे रोमँटिक गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्यामुळे चित्रपटाबद्दलच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'इश्क जैसा कुछ' हा हृतिक आणि दीपिका या दोघांच्या चाहत्यांसाठी एक व्हिज्युअल नजराना आहे. या गाण्यात विदेशातील आकर्षक लोकेशन्सवर दोघांनीही आपली जबरदस्त नृत्य शैली दाखवली आहे. कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस आणि सीझर गोन्साल्विस यांनी या सुंदर जोडीसाठी कुशलतेने नृत्य सीक्वेन्स बनवले आहेत. 'इश्क जैसा कुछ'च्या रिलीजने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून चाहत्यांनी दीपिका आणि हृतिकच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीबद्दल उत्सुकता दाखवली.

विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेले 'इश्क जैसा कुछ' हे गाणं कुमार आणि रॅपर मेलो डी आणि स्वत: विशाल ददलानी यांनी लिहिले गीत आहे. विशाल आणि शेखर व्यतिरिक्त शिल्पा राव आणि रॅपर मेलो डी सारख्या गायक प्रतिभांनी 'इश्क जैसा कुछ' गाण्याला आपला आवाज दिला आहे.

'शेर खुल गए' आणि 'इश्क जैसा कुछ' रिलीज होण्यापूर्वी निर्मात्यांनी महिन्याच्या सुरुवातीला 'फायटर' टीझर लाँच केला होता. टीझरमध्ये हृतिक रोशनची ओळख स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया, दीपिका स्क्वाड्रन लीडर मीनल राठौर आणि अनिल कपूर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंग अशी करुन दिली होती. चित्रपटाच्या दुनियेची एक झलक दाखवत, टीझरमध्ये नेत्रदीपक जेट सीक्वेन्स, नाट्यमय घटना, आकर्षक बॅग्राउंड स्कोअर, आणि जेटमधून खाली उतरताना हृतिकचा तिरंगा धारण केलेला रोमांचक शॉट दाखवण्यात आला आहे.

सिद्धार्थ आनंद यांनी यापूर्वी हृतिक रोशनच्या 'वॉर' आणि 'बँग बँग'चे दिग्दर्शन केले होते. 'फायटर' हा अभिनेता ह्रतिक आणि दिग्दर्शक सिद्धार्थचा तिसरा चित्रपट आहे. एरियल अ‍ॅक्शनरमध्ये करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. फायटर 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

  1. आनंद पंडितच्या बर्थ डे पार्टीत सलमानने मारली अभिषेक बच्चनला मिठी, ट्रोलर्सनी उडवली खिल्ली
  2. बॉक्स ऑफिसवर 'सालार'ची त्सुनामी : 'पठाण', 'जवान', 'अ‍ॅनिमल'चे मोडले अ‍ॅडव्हान्स बुकिंग रेकॉर्ड
  3. 'सालार' नेत्रदीपक ओपनिंगसाठी सज्ज, 100 कोटींपेक्षा जास्त कमाईची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.