ETV Bharat / entertainment

Kaalkoot teaser : रोमांचक थ्रिलर कालाकोट टीझर, पाहा अ‍ॅक्शन मुडमधील विजय वर्मा - विजय वर्मा

विजय वर्माची प्रमुख भूमिका असलेल्या कालाकोट या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यात तो पोलीसाची भूमिका साकारत असून या व्यक्तीरेखेत त्याने प्राण फुंकले आहेत. कालाकोट २७ जुलै रोजी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रिमिंग होणार आहे.

Kaalkoot teaser
अ‍ॅक्शन मुडमधील विजय वर्मा
author img

By

Published : Jul 12, 2023, 6:17 PM IST

मुंबई - अभिनेता विजय वर्माच्या अभिनयावर तमाम समीक्षकांसह प्रेक्षकही खूश आहेत. अलिकडच्या काळात ओटीटी व थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटात विजय असतो तेव्हा त्याला पसंती देणारे खूप प्रेक्षक असतात. एक प्रतिभाशाली अभिनेता अशी ओळख त्याने निर्माण केली आहे. त्याच्या आगामी कालाकोट चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. ओटीटीवर स्ट्रिमिंग होणार असलेल्या या टीझरवर नेहमी प्रमाणे विजय वर्माचे चाहते फिदा झाले आहेत.

टीझरमध्ये आपण पाहतो की विजय वर्मा पोलीस अधिकारी म्हणून रुजू झालाय. त्याची आई त्याच्या लग्नासाठी घाई करत आहे. यासाठी काही मुलींचे फोटो त्याला पाठवण्यात आलेत. मात्र काही तरी दिव्य काम करुन दाखवायचे या ध्येयाने काम करणाऱ्या विजयला लग्नाच्या बंधनात अडकायचे नाही. अशा वेळी नोकरीतील वरिष्ठ आणि परिस्थिती त्याला अनुकुल नाहीय. अशात एका मुलीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला होता. ही पीडित महिला कोण आहे? हल्ला करणारा कोण आहे? त्याला लग्नासाठी आईने सूचवलेल्या मुलींपैकी तर ती कोण नाही? असे प्रश्न हा टीझर पाहून आपल्या मनात तयार होतात.

कालाकोट हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २७ जुलै पासून प्रसारित होणार आहे. या चित्रपटातील त्याची भूमिका आजवरच्या भूमिकाहून वेगळी असली तरी चाहत्यांना तो या भूमिकेतून वेगळी ट्रीट देताना दिसणार आहे. अलिकडे विजय वर्मा त्याची कथित प्रेयसी तमन्ना भाटियामुळे नेहमी चर्चेत असतो. अनेकदा हे जोडपे वेगवेगळ्या ठिकाणी डेट करताना दिसले आहे. मात्र त्यांनी आपल्या रिलेशनशीपला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया अलिकडेच लस्ट स्टोरी २ मध्ये एकत्र दिसले आहेत. यात ती त्याच्या पूर्व पत्नीची भूमिका साकारत आहे. त्यांचे एकत्र काम करणे प्रेक्षकांना खूप आवडल्याचे दिसत आहे. त्यापूर्वी त्याची धाकड ही वेब सिरीज ओटीटीवर प्रसारित झाली होती. यात तो सोनाक्षी सिन्हासोबत स्क्रिन स्पेस शेअर करताना दिसला. पोलीसांना चतुराईने फसवणाऱ्या एका कुख्यात सिरीयल किलरची भूमिका त्यांने यात साकारली होती.

हेही वाचा -

१. Mahesh Babu And Sitara : महेश बाबूला मिळाली प्रेमाने भरलेली मीठी...

२. Aditya Roy Kapur and Ananya Panday : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे स्पेनमध्ये एकाच रॉक कॉन्सर्टमध्ये स्पॉट झाले...

३. Bigg Boss Ott 2 Day 25 Highlights: बिग बॉसने दिले स्पर्धकांना आव्हानात्मक टास्क...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.