ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'मधील उत्तम अभिनयाबद्दल ईशा देओलनं भाऊ बॉबी देओलचं केलं कौतुक - अ‍ॅनिमल चित्रपटात बॉबी देओलचा स्मॅशिंग परफॉर्मन्स

Animal movie : 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. दरम्यान याबद्दल ईशा देओलनं भाऊ बॉबी देओलचं कौतुक केलं आहे.

Animal movie
अ‍ॅनिमल चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 11:40 AM IST

Updated : Dec 3, 2023, 12:13 PM IST

मुंबई - Animal movie : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अ‍ॅक्शन थ्रिलर 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करत आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, सौरभ शुक्ला, सौरभ सचदेवा सुरेश ओबेरॉय, आणि शक्ती कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान, या चित्रपटामधील बॉबी देओलची भूमिका सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये बॉबीनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. आता अभिनेत्री ईशा देओलनं एक पोस्ट शेअर करून भाऊ बॉबी देओलचं कौतुक केलं आहे.

Animal movie
अ‍ॅनिमल चित्रपट

ईशा देओलनं केलं भाऊ बॉबी देओलचं कौतुक : ईशा देओलनं एक फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोवर तिनं लिहिलं, 'उत्तम कामगिरी आणि यश भाऊ' हा चित्रपट पिता-पुत्र नातं आणि गुन्हेगारी अंडरवर्ल्डच्या पार्श्‍वभूमीवर आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं कमाईच्या जबरदस्त ओपनिंग केली आहे. या चित्रपटासोबत विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. सध्या या दोन्ही चित्रपटाची टक्कर रुपेरी पडद्यावर पाहिला मिळत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे. दरम्यान 'अ‍ॅनिमल' चित्रपटाकडून बॉबीला खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटानं खूप लवकर 129.80 कोटींचं लक्ष गाठलं आहे.

बॉबी देओलची कारकीर्द : बॉबीनं 1995 मध्ये ट्विंकल खन्नासोबत 'बरसात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानं 'सोल्जर', 'बादल', 'गुप्त', 'रेस 3',' झूम बराबर झूम' आणि 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे 2000 सालानंतर खूप कमी चित्रपट आल्यामुळे त्याची कारकीर्द घसरली. काही काळ ब्रेक घेतल्यानंतर त्यानं 2018 मध्ये 'रेस 3'द्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. त्यानंतर त्यानं 'आश्रम' हिट वेब सीरिजमध्ये काम केलं. त्यातल्या बॉबीच्या अभिनयाचं कौतुक झालं. या वेब सीरिजमधून त्यानं जबरदस्त कमबॅक केलं. लवकरच बॉबी पुढं तामिळ चित्रपट 'कांगुवा', आणि 'हरि हारा वीरा मल्लू' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 17'मध्ये खानजादीच्या मेंटल हेल्थवर 'जवान' अभिनेत्री रिद्धी डोगरानं केली पोस्ट शेअर
  2. दयाबेन 'तारक मेहतात' परतली, जेटालाल कुटुंबात उत्साहाचं वातावरण
  3. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधील वाद संपला ; नेटफ्लिक्सवर दिसणार एकत्र

Last Updated : Dec 3, 2023, 12:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.