मुंबई : प्रत्येक पिढी आधीच्या पिढीला (movie based on generational conflict) दोष देत आली आहे. परंतु त्या पिढीत आपलेच पालक आहेत, जे नेहमीच आपल्या भल्यासाठीच झटत आले आहेत याचा विसर पडलेला दिसतो. 'आपले म्हणून केले ना, की न साध्य होणाऱ्या गोष्टीसुद्धा सहज साध्य होतात',. हा जगण्याचा यशस्वी मंत्र सांगणाऱ्या संवादापासून 'साथ सोबत'चा ट्रेलर सुरू होतो. त्यानंतर कोकणातील चिरेबंदी-मातीच्या घरांमध्ये रुग्णांची सेवा करणारा संग्राम समेळ (Sangram Samel) आणि मोहन जोशी (Mohan Joshi) हे दोन पिढ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे डॅाक्टर्स दिसतात.
अनोखी आणि खऱ्या अर्थाने लाल मातीतील कथा : कोकणातील भल्या मोठ्या घरात विचार करणारे मोहन जोशी आणि काट्याकुट्यांच्या अवघड वाटा तुडवत औषधोपचारांसाठी पोहोचणारे रुग्ण ट्रेलरमध्ये आहेत. 'कधी तरी केव्हा तरी वाटा हरवल्या...' हे शब्दांच्या माध्यमातून जीवनाचे दर्शन घडवणारे गाणे आहे. या गाण्यात ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक राजदत्तही आहेत. कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्याची 'साथ सोबत' करत या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना काहीतरी महत्त्वपूर्ण संदेश देणार असल्याची खात्री ट्रेलर (emotional trailer of Saath Sobat movie) पाहिल्यावर होते. 'साथ सोबत' चे दिग्दर्शक रमेश मोरे म्हणाले की, 'या चित्रपटात प्रेक्षकांना एक अनोखी आणि खऱ्या अर्थाने लाल मातीतील कथा पहायला मिळणार आहे. चित्रपटाची ओळख करून देणारा ट्रेलर प्रेक्षकांना भावत आहे. यातच 'साथ सोबत'च्या टिमचे यश दडलेले आहे. चित्रपट पडद्यावर पाहतानाही प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.'
प्रमुख भूमिका : मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये वावरणारा संग्राम समेळ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, त्याची जोडी नवोदित अभिनेत्री मृणाल कुलकर्णीसोबत (Mrunal Kulkarni) जमली आहे. याशिवाय राजदत्त, मोहन जोशी, अनिल गवस, अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांनीही अभिनय केला आहे. डिओपी हर्षल कंटक यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, अभिषेक म्हसकर यांनी संकलन केले आहे. यशश्री मोरे यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केले असून, संगीत दिग्दर्शनासोबतच पार्श्वसंगीतही महेश नाईक यांनी दिले आहे. वेशभूषा यशश्री मोरे यांनी यांनी केली असून, रंगभूषा संतोष चारी आणि सतिश भावसार यांनी केली आहे. नृत्य दिग्दर्शनासोबत केशभूषा करण्याची जबाबदारी मीनल घाग यांनी सांभाळली असून, कला दिग्दर्शन प्रकाश कांबळे यांनी केले आहे. 'साथ सोबत' या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते कौशिक मारू आणि यशश्री मोरे आहेत. 'साथ सोबत' येत्या १३ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.