ETV Bharat / entertainment

माहेर सोडून सासरी जाणाऱ्या मुलीसाठीचे मनाला चटका लावणारे गाणे "बकुळा"!

author img

By

Published : Nov 21, 2022, 4:53 PM IST

माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांची होणारी घुटमळ प्रेक्षकांचा दिलाचा ठोका चुकवायला 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' या गाण्यातून समोर आली आहे. डॉ. विनायक पवार यांनी लिहिलेल्या या गीताला नंदेश उमप, प्रियांका बर्वे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी गायले असून हे गाणे ओंकारस्वरूप बागडे आणि वैभव शिरोळे यांनी संगीतबद्ध केले आहे. 'बकुळा' या गाणयातून अलवार नाते गोंजारले जात असून हृदयस्पर्शी असे या गीताचे बोल सर्वसामान्य माणसांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.

Etv Bharat
Etv Bharat

लग्न हा प्रत्येक कुटुंबातील हृद्य सोहळा. त्यात मुलीचे लग्न असेल तर अजूनच हृदयस्पर्शी. अशीच घालमेल प्रेक्षकांना अमुभायला मिळेल 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' या गाण्यातून. माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीसाठी आई, वडील, बहीण, भाऊ यांची होणारी घुटमळ प्रेक्षकांचा दिलाचा ठोका चुकवायला 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' या गाण्यातून समोर आली आहे. 'टीडीएम' चित्रपटातील 'बकुळा' हृदयस्पर्शी गाणे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतंय. यंदाच्या लग्नसराईत नक्की वाजेल असं 'बकुळा' या गाण्याला गायक नंदेश उमप यांनी स्वरसाज चढवलाय.

लग्नसराई म्हटलं की लगीनगीतांशिवाय शोभा येतच नाही. लगीनगीतांचा पॅटर्न हा हळदीचा, वरातीच्या गाण्यांचा असला तरी 'बकुळा' या गाण्यात लग्नातील धमाल-मस्ती सोबतच नववधूच्या मनातील हुरहुर, जोडीदाराची ओढ तसेच लग्नाचा माहोल, पाहुण्यांची लगबग आणि आई, वडील आणि भावाच्या मनातील घुटमळ याचे उत्तम वर्णन या गाण्यातून व्यक्त करण्यात आले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

डॉ. विनायक पवार यांनी लिहिलेल्या या गीताला नंदेश उमप, प्रियांका बर्वे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी गायले असून हे गाणे ओंकारस्वरूप बागडे आणि वैभव शिरोळे यांनी संगीतबद्ध केले आहे. 'बकुळा' या गाणयातून अलवार नाते गोंजारले जात असून हृदयस्पर्शी असे या गीताचे बोल सर्वसामान्य माणसांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' या आशयघन चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी पाहिली.

आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून 'बकुळा' या गाण्याला नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळेल यांत शंका नाही. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी 'टीडीएम' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - पॉवर रेंजर्स स्टार जेसन डेव्हिड फ्रँकचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.