मुंबई - Ektaa Kapoor returns to India : चित्रपट निर्माती एकता कपूर न्यूयॉर्क शहरातील 51व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊन आता भारतात परतली आहे. आज सकाळी ती एमी अवॉर्डसह मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. एकताला तिच्या उत्कृष्ट कारकीर्दीबद्दल आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. विमानतळावर पोहोचल्यानंतर पापाराझींनी तिला घेरलं. एकता नेहमीप्रमाणेच यावेळी आनंदी दिसत होती. ती तिच्या कॅज्युअल लूकमध्ये होती. यावेळी ती अभिमानानं गोल्डन अवॉर्ड घेऊन सर्वांना दाखवत होती. तिनं एमी अवॉर्डसह फोटोसाठी पोझ दिली.
एकता कपूरचं केलं अभिनंदन : एकताच्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, सोशल मीडियावर एका यूजरनं तिचे कौतुक पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं, 'एकता मॅडम, तुमच्यावर खूप अभिमान आहे, लहानपणापासून तुम्हाला पाहत आलो आहे. तुमचे खूप खूप अभिनंदन'. विक्रांत मॅसीननं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, 'खूप खूप शुभेच्छा' तर सेलिना जेटलीनं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, 'तुमचे एमीमधील भाषण पुन्हा पुन्हा ऐकले!! अभिनंदन एकता'. याशिवाय अनेकांनी या पोस्टवर फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
एमी जिंकण्यावर एकता : याआधी एकतानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुरस्काराचा व्हिडिओ शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं होतं, 'इंडिया मी एमीला घरी आणत आहे'. याशिवाय तिनं सर्वांचे आभार देखील मानले होते. टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. या इव्हेंटमध्ये पुरस्कार स्वीकारल्यानंतर एकतानं तिच्या भाषणात म्हटलं होत की, 'सर्वप्रथम मी माझ्या देशाचे आणि भारतीयांचे आभार मानू इच्छिते'. एमी पुरस्कार जिंकल्यानंतर तिनं कार्तिक आर्यनसोबत तिच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचं सध्या शीर्षक ठरायचं आहे. बालाजी मोशन पिक्चर्ससह करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारा हा चित्रपट निर्मित केला जाणार आहे.
हेही वाचा :