मुंबई - Dunki trailer out : सुपरस्टार शाहरुख खाननं मंगळवारी बहुप्रतिक्षित 'डंकी' चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केलं. 'मैत्रीभोवती केंद्रित असलेले जंगली साहस', असं या चित्रपटाबद्दल शाहरुखनं म्हटलंय. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा इंग्लंडला जाण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या पंजाबच्या एका गावातील चार मित्रांभोवती फिरते. व्हिसा आणि तिकिटे नसतानाही ते या प्रवासाला कशी सुरुवात करतात हे यात रंजक पद्धतीनं दाखवण्यात आलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
ट्रेलरची सुरुवात शाहरुख पंजाबमधील गावात पोहोचतो आणि त्याची मैत्री जमते इथून होतं. त्याला भेटलेले चार मित्र मनू (तापसी पन्नू ) , सुखी (विकी कौशल), बुग्गू (विक्रम कोचर) आणि बल्ली ( अनिल ग्रोव्हर) मिळून लंडनला पोहोचण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
'डंकी'च्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान साकारत असलेलं पात्र हरदयाल सिंग ढिल्लॉन (हार्डी) त्याला मायभूमी सोडण्यास का भाग पडले हे सांगताना इंग्रजी येत नाही याबद्दल बोलताना दिसतो. 25 वर्षाच्या अंतरानंतर तो आपल्या या प्रवासाची झलक सांगताना दिसतो.
राजकुमार हिराणी दिग्दर्शित यांना आपण 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'थ्री इडियट्स', आणि 'पीके'सारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी ओळखतो. यूके आणि कॅनडासारख्या देशात जाण्यासाठी स्थलांतरीत करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. यासाठी ते बऱ्याचवेळा अपारंपरिक मार्गाचाही अवलंब करतात. अशा मार्गानं स्थलांतर करणाऱ्या मित्रांची ही कथा 'डंकी'मध्ये नाट्यमय पद्धतीनं मांडण्यात आली आहे.
या चित्रपटातून शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हिराणींच्या चित्रपटांमध्ये नियमितपणे काम करणारा बोमन इराणी देखील यातील कलाकारांचा एक भाग आहे. 'पठाण' आणि 'जवान'च्या यशानंतर 'डंकी' हा यावर्षी रिलीज होणारा शाहरुख खानचा तिसरा चित्रपट आहे. प्रभासच्या सालार चित्रपटाशी 'डंकी'ची बॉक्स ऑफिसवर लढत होताना दिसणार आहे.
'निकले थे हम कभी घर से' या हृदयस्पर्शी गाण्यानंतर 'डंकी'चा ड्रॉप 4मध्ये हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यापूर्वी दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. आता ट्रेलरनंतर लोक चित्रपटाची उत्सुकतेनं प्रतीक्षा करत आहेत.
हेही वाचा -