ETV Bharat / entertainment

'डंकी'च्या हार्ड हिटिंग डायलॉगवर चाहते झाले फिदा - शाहरुख खान स्टारर डंकी चित्रपट

Dunki movie dialogue : अभिनेता शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटामधील एक डायलॉग प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Dunki movie dialogue
डंकी चित्रपटातील डायलॉग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 1:09 PM IST

मुंबई - Dunki movie dialogue : अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपट 'डंकी'साठी चर्चेत असून या चित्रपटाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत. 'डंकी' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाला आहे. 2023 हे वर्ष किंग खानसाठी खूप खास आहे. या वर्षामध्ये त्यानं बॅक टू बॅट दोन चित्रपट हिट दिले. शाहरुख खानचा 'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही अ‍ॅक्शन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'डंकी' चित्रपटातील चौथ 'बंदा' हे गाणं 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालं. हे गाणे लोकप्रिय पंजाबी गायक दिलतेज दोसांझ याने गायलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

शाहरुख खानचा डायलॉग : या गाण्याच्या शेवटी शाहरुख खानचा एक संवाद आहे, जो लोकांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासोबतच समाजाला एक मोठा संदेशही देत​ आहे. शाहरुख खान लंडनच्या कोर्टात 'बंदा' या गाण्यात म्हणतोय, ''जज सर, मला माझ्या देशात कोणताही धोका नाही. माझा देश जसा आहे तसा माझा आहे. 'जय हिंद' इथे राहून मी माझ्या देशाला शिव्या देणार नाही''. शाहरुख खानचा हा डायलॉग सोशल मीडियावर आता सध्या खूप व्हायरल होत आहे. हा डायलॉग देशभक्तीची भावनाही निर्माण करणार आहे. आता अनेकजण हा किंग खानचा डायलॉग ऐकूण त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काही वर्षांपूर्वी देशात असहिष्णुतेचा मुद्दा चांगलाच तापला होता. त्यावेळी हिंदूंना धोका असल्याची चर्चा ही जोरदार सुरू होती.

'डंकी' चित्रपटाबद्दल : 'डंकी' चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलं आहे. हा चित्रपट 120 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. या चित्रपटाला संगीत प्रीतम आणि अमन पंत यांनी दिलं आहे. 'डंकी' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत शाहरुख खानशिवाय बोमन इराणी, तापसी पन्नू आणि विकी कौशल आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाद्वारे राजकुमार हिरानी पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत काम करत आहे. 'डंकी' हा चित्रपट 'पठाण' आणि 'जवान'प्रमाणेच बॉक्स ऑफिसवर धमाल करणार का, हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा :

  1. मेरी ख्रिसमसचा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित,जाणून घ्या तारीख
  2. आदित्य रॉय कपूरने कथित गर्लफ्रेंड अनन्या पांडे स्टारर 'खो गए हम कहाँ'च्या स्क्रीनिंगला लावली हजेरी
  3. 'अ‍ॅनिमल'नं बॉक्स ऑफिस कलेक्शनने केला 500 कोटीचा आकडा पार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.