ETV Bharat / entertainment

'डंकी' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा केला पार

Dunki Box Office Collection Day 9 : शाहरुख खान स्टारर 'डंकी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं एका आठवड्यात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Dunki Box Office Collection Day 9
डंकी बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 9
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 12:12 PM IST

मुंबई - Dunki Box Office Collection Day 9 : अभिनेता शाहरुख खान आणि तापसी पन्नू स्टारर 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. प्रदर्शनानंतर 9 व्या दिवशी या चित्रपटानं 300 कोटींचा टप्पा ओलांडला असून आता हा चित्रपट लवकरच 350 कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. 'डंकी' चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि तापसी पन्नूव्यतिरिक्त बोमन इराणी, अनिल ग्रोव्हर, विकी कौशल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'डंकी' 21 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जवळपास 30 कोटी रुपयांची कमाई केली. 'डंकी'ला रिलीज होऊन नऊ दिवस पूर्ण झाले आहेत.

'डंकी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'डंकी' रुपेरी पडद्यावर प्रभासच्या 'सालार' चित्रपटाशी संघर्ष करतोय. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी'नं ओपनिंग दिवसाला 29.2 कोटीची कमाई केली. यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथा दिवशी 30.7 कोटी, पाचवा दिवशी 24.32 कोटी, सहावा दिवशी 11.56 कोटी आणि सातव्या दिवशी 10.5 कोटी, आठव्या दिवशी 8.21 कोटी आणि नवव्या दिवशी 7.25 कोटीचा गल्ला गोळा केला आहे. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 167.47 देशांतर्गत झालं आहे. जगभरात या चित्रपटानं 317.25 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरत 500 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे. शाहरुख खाननं पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिराणीसोबत काम केलं आहे.

'डंकी'ची एकूण कमाई

पहिला गुरुवार पहिला दिवस - 29.2 कोटी

पहिला शुक्रवार दुसरा दिवस - 20.12 कोटी

पहिला शनिवार तिसरा दिवस - 25.61 कोटी

पहिला रविवार चौथा दिवस - 30.7 कोटी

पहिला सोमवार पाचवा दिवस - 24.32 कोटी

पहिला मंगळवार सहावा दिवस - 11.56 कोटी

पहिला बुधवार सातवा दिवस 10.5 कोटी

दुसरा गुरुवार आठवा दिवस 8.21 कोटी

दुसरा शुक्रवार नव्वा दिवस 7.25 कोटी

एकूण कलेक्शन - 167.47 कोटी

हेही वाचा :

  1. वरुण धवन 'दुल्हनिया 3'सह प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज
  2. "स्वतःला वादांपासून दूर ठेवण्याचा मंत्र जपणार", करीना कपूरचा 2024 साठी दृढ निश्चय
  3. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन आयआयटी बॉम्बे टेकफेस्टसाठी सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.