मुंबई - Dunki Vs Salaar Advance Booking : बॉक्स ऑफिसवर अनेकदा चित्रपटांची टक्कर होते. अलीकडेच 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' यांच्यात संघर्ष बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला. दरम्यान शाहरुख खान आणि प्रभासचा आगामी चित्रपट रुपेरी पडद्यावर भिडताना दिसणार आहे. 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार तर 'सालार' 22 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. 'डंकी' आणि 'सालार'ची आगाऊ बुकिंगही सुरू झाली असून प्री-तिकीट विक्रीत शाहरुख खानचा चित्रपट प्रभास स्टारर चित्रपटापेक्षा आघाडीवर आहे. या दोन चित्रपटांपैकी कुठला चित्रपट बॉक्स ऑफिस बाजी मारेल हे काही दिवसात समजेल.
डिंकी' आणि 'सालार'चं अॅडव्हान्स बुकिंग : 'सॅकनिल'च्या रिपोर्टनुसार 'डंकी'च्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यत 152036 तिकिट विकली गेली आहे. यासह या चित्रपटानं रिलीजपूर्वी 4.71 कोटीची कमाई केली आहे. 'सालार'च्या आगाऊ बुकिंगबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाची आतापर्यंत 159897 तिकिटे विकली गेली आहेत. यासह या चित्रपटानं आतापर्यत 3.86 कोटी रिलीजपूर्वी कमाई केली आहे. किंग खान स्टाररच्या तुलनेत, प्रभासच्या चित्रपटानं 8875 अधिक तिकिटे विकली आहेत, तरीही या चित्रपटानं 3.86 कोटीची कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंग कलेक्शनमध्ये प्रभासचा 'सालार' शाहरुखच्या 'डंकी'पेक्षा 85 लाखांनी मागे आहे.
'डंकी' आणि 'सालार' चित्रपट : शाहरुख खान 'डंकी'च्या प्रमोशनसाठी दुबईत गेला आहे. याशिवाय 'सालार'चे निर्माते आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहेत. 'डंकी'चे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केलं असून शाहरुख खान व्यतिरिक्त या चित्रपटात तापसी पन्नू, बोमन इराणी आणि विकी कौशल यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 120 कोटीच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे. प्रभासच्या 'सालार'चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, मीनाक्षी चौधरी, टिन्नू आनंद, जगपती बाबू, यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 400 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला आहे.
हेही वाचा :